राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू समाजाला एक महत्वाचा संदेश दिला आहे. जर सुरक्षित रहायचे असेल, तर भाषा, जात आणि प्रांत हे मतभेत आणि वाद नष्ट करून संघटित व्हावे लागले, असे भागवत यांनी म्हटले आहे. त्यांनी शनिवारी बारां नगर येथील धान मंडी मैदानात आयोजित स्वयंसेवक एकत्रीकरण कार्यक्रमात 3500 हून अधिक स्वयंसेवकांसोबत संवाद साधला.
भाषा आणि जातीय मतभेदांतून बाहेर पडावे लागले -स्वयंसेवकांसोबत संवाद साधताना भागवत म्हणाले, आपल्या सुरक्षिततेसाठी हिंदू समाजाला भाषा, जात आणि प्रांतासंर्भातील मतभेद आणि वाद सष्ट करून संघटित व्हावे लागेल. असा समाज निर्माण व्हायला हवा, ज्यात संगटन, सद्भावना आणि आत्मीयतेचा भाव असेल.
याशिवाय, समाजात आचरणाची एक शिस्त असायला हवी, राज्याबद्दलचे कर्तव्य आणि टार्गेट ओरिएंटेड असणे आवश्यक आहे. समाज केवळ मी अथवा माझ्या कुटुंबाने तयार होत नाही. तर, आपल्याला समाजाची सर्वांगीण चिंता करून आपल्या जीवनात ईश्वर प्राप्ती करायची आहे,असेही भागवत म्हणाले.
भारत एक हिंदू राष्ट्र -भागवत म्हणाले, भारत एक 'हिंदू राष्ट्र' आहे आणि हिंदू शब्दाचा वापर देशात राहणाऱ्या लोकांच्या 'सर्व संप्रदायां'साठी वापरला जातो. भागवत म्हणाले, हिंदू नाव नंतर आले असले तरी, आपण येथे प्राचिन काळापासून राहत आहोत. येथे राहणाऱ्या भारतातील सर्व संप्रदायांसाठी हिंदू शब्द वापरला जातो.