नवी दिल्ली: सध्या देशभरात सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी यावरुन वातावरण तापलंय. शाहीन बागेसह अनेक ठिकाणी सीएए आणि एनआरसीविरोधात आंदोलनं सुरू आहेत. एनआरसी लागू झाल्यास नागरिकत्व जाईल, अशी भीती व्यक्त केली जातेय. याच पार्श्वभूमीवर माहिती अधिकाराच्या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे असलेल्या नागरिकत्व दाखल्यांचा तपशील मागण्यात आला होता. मोदींचा जन्म भारतात झाल्यानं त्यांना नागरिकत्व दाखल्यांची आवश्यकता नसल्याचं उत्तर पंतप्रधान कार्यालयानं दिलं आहे.द क्विंट या संकेतस्थळानं दिलेल्या वृत्तानुसार, शुभांकर सरकार यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींच्या नागरिकत्वाबद्दलचा तपशील मागितला होता. त्यावर नागरिकत्व कायदा १९५५ च्या कलम ३ अंतर्गत पंतप्रधान मोदी जन्मानं भारतीय आहेत. त्या आधारे ते भारतीय ठरतात. त्यामुळे त्यांच्या नागरिकत्व दाखल्यांचा प्रश्नच उद्भवत नाही, असं उत्तर पंतप्रधान कार्यालयानं दिलं.
महत्त्वाच्या बातम्या-रोहित पवारांनी केला आदित्य ठाकरेंचा बचाव; आशिष शेलार अन् चंद्रकांत पाटलांना दिलं 'असं' उत्तर...तर तो हिंदूंच्याच हातून मार खाईल; शिवसेनेचा भाजपावर निशाणा India vs New Zealand, 2ndTest: न्यूझीलंडकडून भारताला व्हाईटवॉश; दुसऱ्या कसोटीसह मालिका जिंकलीतुर्कीचा सीरियावर ड्रोन हल्ला, 19 सैनिकांचा मृत्यू