- डाॅ. खुशालचंद बाहेती
अमरावती (आंध्र प्रदेश) : वाहनाची नोंदणी करताना वसूल करण्यात येणारा वन टाइम रोड टॅक्स वाहनाच्या निव्वळ किमतीवर वसूल केला जाऊ शकतो. निव्वळ किमतीत जीएसटी व सेसचा समावेश करून त्यावर केली जाणारी कर आकारणी रद्द करत आंध्र प्रदेश हायकोर्टाने वसूल केलेली जादा रोड टॅक्सची रक्कम परत करण्याचे आदेश दिले आहेत.
परिवहन विभागाने वाहन नोंदणी करताना जादा वसुली केल्याची तक्रार करत जास्तीची रक्कम परत मिळावी, म्हणून हायकोर्टात दोन याचिका दाखल झाल्या होत्या. परिवहन विभाग वाहन खरेदी करताना शोरूममध्ये दिलेल्या एकूण रकमेवर रोड टॅक्स घेते. यात वाहनाची निव्वळ किंमत, जीएसटी व सेसचा समावेश असतो. म्हणजेच जीएसटी व सेसच्या स्वरुपात भरलेल्या कराच्या रकमेवर पुन्हा कर वसूल केला जातो. याला याचिकेत आक्षेप घेण्यात आला होता.
महाराष्ट्रात काय?परिवहन आयुक्तांनी २६ मार्च २०२१ रोजी वाहनाच्या किमतीत जीएसटी व सेस जोडून त्यावर रोड टॅक्स वसूल करण्याचे आदेश दिले. आंध्र प्रदेश निकालाच्या आधारे परिपत्रकाला हायकोर्टात आव्हान दिल्यास अनेकांना रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे.
परिवहन विभागाचे म्हणणे असे, वाहनाची किंमत ही खरेदीदारांनी प्रत्यक्ष दिलेली रक्कम असते. यामुळे वाहनाची किंमत जीएसटी, सेस वगळून ठरवता येणार नाही. हा युक्तिवाद न्यायमूर्तींनी फेटाळला.
महाराष्ट्र व चंडीगडमध्ये कर तफावत टोयोटो फॉर्च्युनर किंमत ४१ लाख २२ हजार रु.महाराष्ट्रात एकरकमी रोड टॅक्स ६ लाख ४५ हजार ८८० रु. हाच कर चंडीगडमध्ये २ लाख २३ हजार ८४० रु.