पोलिसांकडून दुजोरा नाही: सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यांवरील वृत्ताने खळबळफोटो28कलबुर्गी किलर स्केच28 डेड बॉडीबेळगाव : जेष्ठ कन्नड साहित्यीक आणि पुरोगामी नेते एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्या प्रकरणातील संशयित मारेकर्याच्या रेखाचित्राशी साम्य असणारा एक मृतदेह खानापूरच्या जंगलात सापडला. हा मृतदेह संशयित मारेकरी सनातनचा बेपत्ता साधक रुद्रगौडा पाटील याचाच असल्याचे वृत्त सोशल मिडियावर फिरु लागले.काही वाहिन्यांनीही ते देण्यास सुरवात केल्यामुळे बुधवारी खळबळ उडाली. दिवसभर चर्चेचा विषय झाला . पण पोलिसांनी किंवा इतर तपास यंत्नणांनी हा मृतदेह रुद्रगौडाचा असल्याच्या वृत्ताला अद्याप दुजोरा दिलेला नाही.उत्तर विभागाचे पोलीस महासंचालक उमेशकुमार यांनी देखील मृतदेहाची ओळख पटली नसल्याचे सांगितले .18 ऑक्टोबर रोजी खानापूर जवळील माणिकवाडी येथील जंगलात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह मिळाला होता . पोलिसांनी त्या मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर विच्छेदन करून तो मृतदेह बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवला होता. ओळख न पटल्यामुळे त्या मृतदेहाचे मंगळवारी पोलिसांनी दफन केले . जंगलात सापडलेल्या मृतदेहाचे छायाचित्न खानापूर येथील एका व्यक्तीने मोबाईलवर काढले होते . तो मृतदेह आणि कलबुर्गी यांच्या हत्येनंतर जाहीर केलेले मारेकर्याचे रेखाचित्र यात साम्य असल्याचे छायाचित्न काढलेल्या व्यक्तीच्या ध्यानात आले . नंतर त्याने मृतदेहाचे छायाचित्न आणि कलबुर्गी यांच्या मारेकर्याचे पोलिसांनी जाहीर केलेले रेखाचित्न सोशल मिडीयावर पोस्ट केले . त्यानंतर काही वाहिन्यांनी कलबुर्र्गी यांच्या मारेकर्याच्या चेहर्याशी अज्ञात मृतदेहाचे साम्य असल्याची ब्रेकिंग न्यूज दाखवायला सुरु केल्यावर सापडलेला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह हा मडगाव येथे 2009 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर बेपत्ता असलेल्या रुद्रगौडा पाटीलचा असावा अशी देखील चर्चा रंगू लागली .चौकटवयातील फरकअज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाचे वय 25 ते 30 दरम्यान असण्याची शक्यता असून रुद्रगौडाचे वय सध्या 40 किंवा त्यापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे . त्यामुळे हा मृतदेह रुद्रगौडाचा असण्याची शक्यता कमी असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.चौकटमृतदेह पुन्हा बाहेर काढणारकर्नाटक सीआयडीचे एक पथक आज गुरुवारी जिलत दाखल होत आहे. या पथकाकडून खानापूर पोलिसांनी दफन केलेला तो मृतदेह पुन्हा बाहेर काढून त्याचा पुन्हा पंचनामा केला जाण्याची शक्यता आहे.
रुद्रगौडाचा मृतदेह बेळगावजवळ जंगलात सापडला?
By admin | Published: October 28, 2015 11:36 PM