शहरं
Join us  
Trending Stories
1
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
2
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
3
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
4
Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
5
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
6
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
7
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
8
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
9
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
10
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
11
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
12
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
13
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
14
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
15
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
16
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
17
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
18
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
19
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
20
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!

बेपत्ता हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले, सर्व क्रू मेंबर्सचा मृत्यू झाल्याची भीती

By admin | Published: July 05, 2017 9:12 PM

अरुणाचल प्रदेशमध्ये काल बेपत्ता झालेल्या भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले आहेत.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 5 - अरुणाचल प्रदेशमध्ये काल बेपत्ता झालेल्या भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले आहेत. हेलिकॉप्टरमधील सर्व क्रू मेंबर्सचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अरुणाचल प्रदेशच्या पापुमपरे भागामध्ये हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले आहेत. मंगळवारी पूरस्थिती असलेल्या परिसरामध्ये मदतकार्य करत असताना अरुणाचल प्रदेशमधील सगली गावाजवळ हेलिकॉप्टर बेपत्ता झाले होते. या हेलिकॉप्टरमध्ये तीन जण होते. अरुणाचल प्रदेशच्या सगली गावाजवळ हे हेलिकॉप्टर बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर रडारवरून गायब झाल्याची माहिती आहे. इटानगर ते नहरलगूनदरम्यान हेलिकॉप्टर अचानक रडारवरून गायब झालं होतं. हवाई दलाचं हे हेलिकॉप्टर पूरस्थिती असलेल्या परिसरांमध्ये बचाव मोहिमेवर होतं. ही घटना घडली त्याचवेळी केंद्रीय गृह राज्य मंत्री किरेन रिजिजू यांच्या हेलिकॉप्टरचीही इमर्जन्सी लॅन्डिंग करावी लागली. इटानगरमध्ये पॉलिटेक्निक क्रीडा मैदानात रिजिजू यांच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लॅन्डिंग केलं होतं. रिजिजू यांनीच मीडियाला याबाबत माहिती दिली.

आणखी वाचा(हेलिकॉप्टर उड्डाणाचे मानदंड ठरविणार)(हेलिकॉप्टर कोसळले; मुख्यमंत्री बचावले!)

गेल्या काही काळात हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातांच्या कारणांची सखोल तपासणी करण्यात येत आहे. त्यातील अभ्यासावरून उड्डाणांबाबत कठोर मानदंड घालून देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली होती.सिन्हा म्हणाले, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातावेळी तर जमिनीवरील धुरळा उडू नये, यासाठी साधे पाणी मारण्याची देखील खबरदारी घेतली नव्हती. मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातासह इतर अपघातांच्या कारणांची सखोल तपासणी सुरू आहे. वैद्यकीय आणि धार्मिक पर्यटनासाठी हेलिकॉप्टरने प्रवास केला जातो. त्यासाठी अगदी दुर्गम भागातही जावे लागते.