शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

‘सुल्तान’च्या सरावानंतर बलात्कार पीडितेसारखे वाटत होते - सलमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2016 3:02 AM

कुस्तीवर आधारित ‘सुल्तान’ या चित्रपटासाठी मला कठोर प्रशिक्षण घ्यावे लागले. या चित्रपटाचे चित्रीकरण थकवून टाकणारे असायचे. शूटिंग संपल्यानंतर एखाद्या बलात्कार झालेल्या महिलेसारखे वाटायचे

नवी दिल्ली : कुस्तीवर आधारित ‘सुल्तान’ या चित्रपटासाठी मला कठोर प्रशिक्षण घ्यावे लागले. या चित्रपटाचे चित्रीकरण थकवून टाकणारे असायचे. शूटिंग संपल्यानंतर एखाद्या बलात्कार झालेल्या महिलेसारखे वाटायचे, असे उद्गार अभिनेता सलमान खान याने काढले आहेत. या विधानानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असून, भाजपासह विविध पक्षांनी त्याने माफी मागावी यासाठी दबाव वाढविला आहे. मात्र आपल्या मुलाच्या या विधानाबद्दल सलमानचे वडील लेखक सलीम खान यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. सलमानने केलेले विधान बेफिकीर आणि बेजबाबदारपणाचे असून, त्याने जाहीर माफी मागतानाच या विधानाबाबत स्पष्टीकरण द्यावे, असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख ललिता कुमारमंगलम यांनी मंगळवारी स्पष्ट केले. आयोगाने त्याच्या वक्तव्याची स्वत:हून दखल घेत त्याला पत्र पाठविले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)काय म्हणाला सलमान खान ?आगामी सुल्तान चित्रपटात कुस्तीगीराची भूमिका बजावताना कसे वाटले, असा प्रश्न मुलाखतीच्यावेळी विचारला असता सलमान म्हणाला की, सुल्तान चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी खूप परिश्रम घ्यावे लागत होते. शूटिंग संपल्यानंतर खूप थकून जात होतो. एखाद्या बलात्कार पीडितेसारखे वाटायचे. मला १२० किलो वजनाच्या कुस्तीपटूला १० वेळा १० वेगवेगळ्या कोनांतून उचलावे लागायचे. त्याला अनेकदा उचलून जमिनीवर आदळतही होतो. सरावानंतर माझ्यात त्राण उरत नव्हते. मला बलात्कार झालेल्या महिलेसारखे वाटायचे. मी चालूही शकत नव्हतो. मी जेवण केल्यानंतर थेट कुस्तीच्या सरावासाठी जायचो. प्रशिक्षण थांबवता येत नव्हते.पिता सलीम खान यांनी मागितली माफीविनोदाच्या अंगाने किंवा उदाहरण देण्याच्या उद्देशाने सलमान जे काही बोलला ते चुकीचे होते, यात कोणतीही शंका नाही. त्याचा या विधानामागचा उद्देश चुकीचा नव्हता, तथापि मी माझे कुटुंबीय, त्याचे चाहते आणि मित्रांच्यावतीने माफी मागतो. त्याला क्षमा करावी, असे सलमानचे वडील प्रसिद्ध पटकथा लेखक सलीम खान म्हणाले.बलात्कार काय असतो हे सलमानला माहीत नाही. त्याची तुलना १२० किलो वजन उचलण्याशी करता येत नाही. त्याचे वक्तव्य दुर्दैवी असून घोर निंदनीय आहे. त्याचे चाहते विशेषत: महिला प्रशंसक त्याच्या विधानावर निश्चितच नकारात्मक प्रतिसाद देतील, असे वाटते.- ललिता कुमारमंगलम,

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षसलमान खानने माफी मागावी. चुकून जीभ घसरल्याने (स्लीप आॅफ टंग) तो बोलला असावा. मात्र त्याचा बचाव करता येत नाही. त्याने केलेले विश्लेषण चुकीचे होते. स्वत:चा आदर जपणाऱ्या महिलांसाठी त्याने माफी मागायलाच हवी.- शायना एनसी, भाजपा प्रवक्त्या.