शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

उपद्रवींच्या मुसक्या आवळणार

By admin | Published: August 28, 2016 12:40 AM

केंद्रीय संस्थांनी जम्मू आणि काश्मीरात निदर्शनांसाठी लोकांना भडकावणाऱ्या ४०० स्थानिक नेत्यांची ओळख पटविली असून खोऱ्यातील हिंसाचार सत्र थांबविण्यासाठी पोलिस

नवी दिल्ली : केंद्रीय संस्थांनी जम्मू आणि काश्मीरात निदर्शनांसाठी लोकांना भडकावणाऱ्या ४०० स्थानिक नेत्यांची ओळख पटविली असून खोऱ्यातील हिंसाचार सत्र थांबविण्यासाठी पोलिस लवकरच त्यांची धरपकड करणार आहेत. या यादीत हिजबुल मुजाहिद्दीन आणि इतर दहशतवादी संघटनेचे कार्यकर्ते तसेच तेहरीक ए हुरियत, जमात ए इस्लामीच्या स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे, असे गुप्तचर अधिकाऱ्यांनी सांगितले. हे स्थानिक नेतेच किशोरवयीन मुलांसह १० ते १२ वर्षांच्या मुलांना दगडफेक करण्यास चिथावतात. यातील काही जण दक्षिण काश्मिरात हिजबुलचे उघडणपणे काम करणारे कार्यकर्ते असून ते दहशतवाद्यांना आश्रय देण्यासह इतर सुविधा पुरविण्याचे काम करतात, असेही सूत्रांनी सांगितले. केंद्रीय संस्थांनी त्यांची नावे राज्य पोलिस दलाला दिली आहेत. श्रीनगर : ४९ दिवसानंतर दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग शहरातील संचारबंदी उठविताच, तिथे हिंसाचार झाला आणि त्यात २५ जण जखमी झाले. त्यामुळे पुन्हा तिथे संचारबंदी लागू करावी लागली. श्रीनगरसह इतर काही भागात संचारबंदी कायम ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. फुटीरवाद्यांचा बदामीबाग येथील लष्करी मुख्यालयावर मार्च काढण्याचा मनसुबा होता. मात्र, हुरियत कॉन्फरन्सचे नेते सईद अली शाह गिलानी यांना अटक करून पोलिसांनी हे प्रयत्न उधळून लावले. गिलानी नजरकैदेत आहेत. त्यांनी त्याचे उल्लंघन करताच हैदरपुरा येथील त्यांच्या निवासस्थानाजवळ त्यांना अटक करण्यात आली. श्रीनगर आणि दक्षिण काश्मीरातील पुलवामा आणि पम्पोर येथील संचारबंदी मात्र कायम ठेवण्यात आली आहे.दरम्यान, संचारबंदी, जमावबंदी आणि फुटीरवाद्यांच्या बंदमुळे ५० व्या दिवशीही खोऱ्यातील जनजीवन सुरळित होऊ शकले नाही. दुकाने, खासगी कार्यालये, शैक्षणिक संस्था आणि पेट्रोलपंप बंद होते. याशिवाय संपूर्ण खोऱ्यात मोबाईल इंटरनेट सेवा बंद आहे. हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुऱ्हाण वनी चकमकीत ठार झाल्यापासून सुरू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत ६८ लोकांचा बळी गेला असून त्यात दोन पोलिसांचा समावेश आहे. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात पोलिस कर्मचाऱ्याची संशयित अतिरेक्यांनी शनिवारी गोळ््या घालून हत्या केली. कॉन्स्टेबल अहमद गनाई यांच्यावर कोईल येथील त्यांच्या निवासस्थानाजवळ अज्ञात बंदुकधाऱ्याने गोळीबार केला. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. तथापि, त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. (वृत्तसंस्था)जगात पाकचा कांगावा- काश्मीरमधील जनतेवर भारत सरकार कसे अत्याचार आणि अन्याय करीत असल्याचा जगभरातील देशांमध्ये प्रचार करण्यासाठी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी २२ संसद सदस्यांची नियुक्ती केली आहे. हे खासदार संयीक्त राष्ट्रांमध्ये तसेच सर्व देशांमध्ये जातील आणि भारतातर्फे काश्मीरमधील जनतेवर अत्याचार असल्याचा प्रचार करतील. - काश्मिरी जनतेला आपण कुठे राहायचे, याबाबतचा स्वयंअधिकार मिळावा, ही मागणी संयुक्त राष्ट्रांमध्ये कणखरपणे मांडण्यात येईल, असे नवाज शरीफ यांनी म्हटले आहे. पूर्वी भारतानेच काश्मीर वादाचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांमध्ये उपस्थित केला होता. पण आता त्याविषयी काहीच बोलायला भारत तयार नाही, असे पाकिस्तानी पंतप्रधानांनी म्हटल्याचे वृत्त रेडिओ पाकिस्तानने दिले आहे.