शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

टायमर बॉम्बच्या संदेशाने रेल्वे स्थानकावर मध्यरात्री धावपळ

By admin | Published: November 22, 2015 12:41 AM

जळगाव: पोरबंदर-सांतराकांछी १२९४९ या कवीगुरु एक्सप्रेसमध्ये टायमर बॉम्ब असल्याचा संदेश मिळाल्याने शुक्रवारच्या मध्यरात्री व शनिवारच्या पहाटे जळगाव रेल्वे स्थानकावर प्रचंड धावपळ उडाली. बॉम्ब शोधक व श्वान पथकामार्फत गाडीची तपासणी होत असताना प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दीड तासाच्या तपासणीनंतर गाडीत कोणतीही आक्षेपार्ह वस्तू नसल्याचे जाहिर झाल्यावर प्रवाशांच्या जीवात जीव आला.

जळगाव: पोरबंदर-सांतराकांछी १२९४९ या कवीगुरु एक्सप्रेसमध्ये टायमर बॉम्ब असल्याचा संदेश मिळाल्याने शुक्रवारच्या मध्यरात्री व शनिवारच्या पहाटे जळगाव रेल्वे स्थानकावर प्रचंड धावपळ उडाली. बॉम्ब शोधक व श्वान पथकामार्फत गाडीची तपासणी होत असताना प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दीड तासाच्या तपासणीनंतर गाडीत कोणतीही आक्षेपार्ह वस्तू नसल्याचे जाहिर झाल्यावर प्रवाशांच्या जीवात जीव आला.
गुजरातकडून येणार्‍या कवीगुरु एक्सप्रेसमध्ये टायमर बॉम्ब असल्याचा संदेश येथील जीआरपीला मध्यरात्री त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाकडून देण्यात आला. त्यामुळे जीआरपी व आरपीएफ यांच्यात प्रचंड खळबळ उडाली. आरपीएफचे निरीक्षक गोकुळ सोनोने यांनी तत्काळ बॉम्ब शोधक पथकला (बीडीडीएस) पाचारण केले. भुसावळ येथील आरपीएफ इंटेलीजन्सलाही कळविले. बीडीडीएसचे बडगुजर यांनी सनी व रॉली तर भुसावळच्या आरपीएफचे सहायक फौजदार जाधव यांनी सुर्या नावाच्या श्वानाला पाचारण केले. इंटेलीजन्सचे रोशनसिंग हे देखील भुसावळहून दाखल झाले.
यंत्रणा सज्ज
गाडी प्लॅटफार्मवर येण्याची आधी सर्व यंत्रणा सज्ज झाली होती. त्यानुसार ही एक्सप्रेस रात्री २.१५ वाजता जळगाव रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक चारवर आली. सुरुवातीला प्रवाशांना कोणतीच माहिती सांगण्यात आली नाही. २.१५ ते.३.४० असा दीड तास प्रत्येक बोगीत श्वान व बीडीडीएसकडून तपासणी होत असल्याने प्रवाशांना बॉम्बची कुणकुण लागली. निरीक्षक गोकुळ सोनोने, उपनिरीक्षक एस.पी.यादव, जीआरपीचे उपनिरीक्षक खलील शेख यांनी तपासणी करतांनाच प्रवाशांना दिलासा दिला. इंजिनपासून तर शेवटच्या बोगीपर्यंत सर्व बोग्या तपासल्यानंतर त्यात काहीच आक्षेपार्ह न आढळल्याने या अधिकार्‍यांनी तपासणीचे कारण स्पष्ट केले.
प्रमाणपत्रानंतर गाडी रवाना
बीडीडीएसचे प्रमाणपत्र जीआरपीला मिळाल्यानंतर गाडी पुढच्या प्रवासाला रवाना झाली. तपासणीअंती गाडीत कोणतीच आक्षेपार्ह वस्तु आढळली नाही असे प्रमाणपत्र बीडीडीएसने जीआरपीला दिले. त्यानंतर त्यांनी हे प्रमाणपत्र स्टेशन मास्तरला दिले व नंतर गाडीला हिरवा सिग्नल देण्यात आला.
नंदुरबारला ४५ मिनिटे तपासणी
जळगावला येण्याआधी नंदुरबारलाही ४५ मिनिटे गाडी थांबवून त्याची तपासणी करण्यात आली. तेथही श्वानच्या माध्यमातून तपासणी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, बॉम्बच्या अफवेमुळे गाडीला अडीच तास उशिर झाला. पहिला संदेश गुजरातमध्ये देण्यात आला होता. त्यानंतर जळगावला हा संदेश देण्यात आला.