Russia : पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया दौऱ्यावर आहेत. पीएम मोदी यांच्या दोन दिवसीय रशिया दौऱ्यात व्यापार, ऊर्जा, हवामान आणि संशोधन यासह विविध क्षेत्रांमध्ये ९ करारांवर स्वाक्षरी केली. यादरम्यान दोन्ही देशांमध्ये अनेक मोठ्या प्रकल्पांवर करार झाला, यामध्ये रशियाच्या सहकार्याने भारतात ६ नवीन अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यावरही चर्चा झाली. रशियाची अणुऊर्जा एजन्सी रोसाटॉम ही अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी भारताला मदत करेल. रशियन एजन्सीने कुडनकुलम न्यूक्लियर पॉवर प्लांटच्या स्थापनेसाठी भारताला आधीच मदत केली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची त्यांच्या दोन दिवसीय मॉस्को दौऱ्यादरम्यान क्रेमलिन या अधिकृत निवासस्थानी भेट घेतली.
"भाजपाचा अयोध्येत पराभव झाल्याने मोदी आता जय श्रीराम म्हणत नाहीत, हिंदू धर्माला..."
दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि नंतर द्विपक्षीय चर्चेत भाग घेतला. यामध्ये रशियन सरकारच्या मालकीच्या रोसाटॉमने भारताला सहा नवीन अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यास मदत करण्याची ऑफर दिली. याशिवाय रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडाने भारतासोबत फार्मा, जहाजबांधणी आणि शिक्षण क्षेत्रात करार केले. रशियाच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या बँकेने दोन्ही देशांमधील व्यापार वाढत असताना पेमेंट प्रवाह सुलभ करण्याच्या प्रयत्नांवर भारताशी चर्चा केली.
रोसाटॉम'ने एका निवेदनात म्हटले आहे की, भारतासोबत सहकार्याच्या नवीन क्षेत्रांवर चर्चा केली जात आहे - नवीन साइटवर रशियन डिझाइनचे आणखी सहा उच्च-शक्ती अणु युनिट्स बांधणे आणि काही लहान अणुऊर्जा प्रकल्प बांधण्यासाठी भारताला सहकार्य करणे. या वर्षी मे महिन्यात रोसाटॉमने भारताला फ्लोटिंग न्यूक्लियर पॉवर प्लांट बांधण्यासाठी आणि चालवण्याचे तंत्रज्ञान दिले होते.
जगात फक्त हे तंत्रज्ञान रशियाकडेच आहे
रशियाकडे पाण्यावर तरंगणारा अणुऊर्जा प्रकल्प आहे. असा प्रकल्प असणारा रशिया हा एकमेव ऊर्जा प्रकल्प आहे. अकादमिक लोमोनोसोव्ह जहाजावर हा अणुप्रकल्प तयार करण्यात आला आहे. रशियातील पेवेकमध्ये वीजपुरवठा या तरंगत्या अणुऊर्जा प्रकल्पातून केला जात आहे. पेवेक हे उत्तर आर्क्टिकमध्ये स्थित रशियाचे एक बंदर शहर आहे. रशियाशिवाय अन्य कोणत्याही देशाला अद्याप तरंगत्या अणुऊर्जा प्रकल्पाचे तंत्रज्ञान विकसित करता आलेले नाही. या प्रकारच्या प्लांटमधून अगदी दुर्गम भागात किंवा समुद्रात वसलेल्या बेटांनाही अखंडित वीजपुरवठा करता येतो.
रोसाटॉम आणि भारत उत्तर सागरी मार्गाची ट्रांझिट क्षमता विकसित करण्यावरही चर्चा करत आहेत. हा सागरी मार्ग रशियाच्या नॉर्वेच्या सीमेजवळील मुर्मन्स्कपासून पूर्वेकडे अलास्काजवळील बेरिंग सामुद्रधुनीपर्यंत पसरलेला आहे. हा सागरी मार्ग रशियन तेल, कोळसा आणि द्रव नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यासाठी महत्त्वाचा आहे. रशियाला २०३० पर्यंत NSR द्वारे १५० मिलियन मेट्रिक टन वाहतूक करण्याचे टारगेट आहे, यातील या वर्षी ८० मिलियन मेट्रिक टनांनी वाढले आहे.