नवी दिल्ली - युक्रेन युद्धात रशियाच्या सैन्यात तैनात असलेल्या आणखी २ भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली. त्यानंतर भारताने स्पष्ट भूमिका घेत रशियाने कोणत्याही परिस्थितीत आपल्या सैन्यात भारतीयांची भरती थांबवावी. हा प्रकार दोन्ही देशांच्या भागीदारीसाठी चांगला नाही, असे मत व्यक्त केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, मॉस्कोमधील भारतीय दुतावासाने दोन्ही भारतीय नागरिकांचे मृतदेह लवकरात लवकर परत आणण्यासाठी रशियाच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणला आहे. मंत्रालयाने भारतीयांना रशियामध्ये नोकरीच्या संधी चालून आल्यास सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. सरकारने भारतीयांना परत पाठवण्याची मागणी केली आहे.
आतापर्यंत अनेक भारतीयांचा मृत्यू- रशियाच्या सैन्यात भरती झालेल्या अनेक भारतीय नागरिकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. एप्रिलमध्ये भारताची तपास यंत्रणा सीबीआयने रशिया-युक्रेन युद्धात भारतीयांना फसवणूक करून पाठवल्याप्रकरणी ४ जणांना अटक केली होती. - त्यातील तीन जण भारतातील होते, तर एकजण रशियाच्या संरक्षण मंत्रालयात काम करणारा अनुवादक होता. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, दिल्लीस्थित व्हिसा कंपनीने आतापर्यंत सुमारे १८० भारतीयांना रशियाला पाठविले आहे.
१ लाख रुपये पगाराचे आमिषतपास यंत्रणेने सांगितले होते की, दिल्लीतील व्हिसा कन्सल्टन्सी कंपन्या परदेशात काम करण्याची इच्छा असलेल्यांना लक्ष्य करतात. त्यानंतर त्यांना फसवण्यासाठी यूट्यूब व्हिडिओ बनविले जातात.
भरती होण्याची बळजबरी- व्हिडीओमध्ये नोकरी करणाऱ्या लोकांना युद्ध लढण्यासाठी सीमेवर जावे लागणार नाही. त्यांना ३ महिने प्रशिक्षण दिले जाणार असून, त्यादरम्यान त्यांना ४० हजार रुपये पगार मिळणार आहे.- प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पगार एक लाख रुपये असेल, असा दावा करण्यात येतो. सैन्यात सामील झाले नाहीत तर १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होईल, अशी तरतूद असलेली गदपत्रे दाखवून धमकावले जाते.