नवी दिल्ली - एकीकडे रशिया आणि युक्रेन या देशात युद्धाची ठिणगी पडली असून गेल्या 15 दिवसांपासून रशियाने युक्रेनवर बॉम्बहल्ले सुरू केले आहेत. युक्रेनही रशियाला प्रत्युत्तर देताना दिसून येत आहे. या युद्धाचा परिणाम जागतिक पातळीवर झाल्याचे दिसून येत आहे. भारताने या युद्धात तटस्थ भूमिका घेतली आहे. दुसरीकडे पुन्हा एकदा भारताने ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ मिसाईलचे यशस्वी परिक्षण केले. दोन दिवसांपूर्वी भारताने याची चाचणी केली. संरक्षण खात्यातील अधिकाऱ्यांच्यामते या मिसाईलने दूरपर्यंत हल्ला करण्यात स्वत:ला सिद्ध केलंय.
अंदमान-निकोबार समुद्रावरील एका निर्जन स्थळावरुन या मिसाईलचे लाँचिंग करण्यात आले होते. या मिसाईलने आपल्या निश्चित स्थळी एकदम बरोबर हल्ला केला. विना वारहेडसह या मिसाईलला लाँच करण्यात आले होते. भारतीय नौसेनेने शनिवारी आयएनएस चेन्नई येथून दूरपर्यंत हल्ला करणाऱ्या ब्रह्मोस मिसाईलचे परिक्षण केले. त्यावेळी, आयएनएस चेन्नई येथून ह्या मिसाईलला लाँच करण्यात आले. मिसाईलमध्ये अनेक एडव्हान्स फिचर अॅड करण्यात आले आहेत. त्यामुळे, मिसाईलची मारक क्षमता अधिक तीव्र व वेगवान झाली आहे.
हे मिसाईल 400 किमीच्या रेंजपर्यंत एकदम अचून वेगवान निशाणा साधू शकते. जेव्हा शास्त्रज्ञ या मिसाईलच्या रेंजला आणखी वाढविण्यासाठी संशोधन करत आहेत, त्यातूनच सातत्याने मिसाईलच्या चाचण्या घेण्यात येत आहेत. भारत आणि रशियाने संयुक्तितपणे हे मिसाईल निर्माण केले आहे. त्यामुळेच, जगभरातील शक्तीशाली आणि सर्वात घातक मिसाईल म्हणून हे परिचीत आहे. मिसाईल 8.4 मीटर लांब आणि 0.6 मीटर चौरस आहे. हे मिसाईल 2.5 टन परमाणू युद्धास्त्र घेऊन जाण्यासही सक्षम आहे. भारताने नेव्ही, एअरफोर्स आणि सैन्य दलातही विशेष स्वतंत्र वर्जनद्वारे सामिल केले आहे. त्यामुळे, भारताच्या तिन्ही दलाची ताकद वाढली आहे.