Russia-Ukraine War: "7 दिवसांत 6222 भारतीय मायदेशी आणले, आता 50 किमीवर विमानतळ सापडले"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 03:46 PM2022-03-05T15:46:00+5:302022-03-05T15:51:32+5:30
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले, पूर्व युक्रेनमधील संघर्षमय भागातून भारतीयांना सुरक्षित परत आणण्यास आमचे प्राधान्य आहे.
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशात आणले जात असून आत्तापर्यंत ‘ऑपरेशन गंगा’द्वारे आतापर्यंत ४८ फेऱ्यांद्वारे १० हजार ३०० भारतीयांना परत आणण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी शनिवारी भारतीय वायू सेनेकडून ४, तर इतर विमानांच्या ११ फेऱ्या होणार असल्याची माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिली होती. आता, युक्रेनजवळील सुकेव्हा येथे भारतीय वायूसेनेले नवीन विमानतळ आढळू आले आहे. त्यामुळे, आता या ठिकाणाहून भारतीयांना मायदेशी परत आणले जाणार आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले, पूर्व युक्रेनमधील संघर्षमय भागातून भारतीयांना सुरक्षित परत आणण्यास आमचे प्राधान्य आहे. भारतीयांना बाहेर काढता यावे, यासाठी मार्ग काढण्याबाबत आम्ही दोन्ही देशांना सातत्याने विनंती करीत आहोत. स्थानिक युद्धबंदी हा पर्याय असू शकतो. भारताने पहिली ॲडवायजरी जारी केल्यानंतर सुमारे २० हजार भारतीय बाहेर पडल्याचे बागची यांनी सांगितले. तर, गेल्या 7 दिवसांत ऑपरेशन गंगा या मोहिमेंतर्गत 6222 भारतीयांना मायदेशी आणण्यात आले आहे. रोमानिया आणि मोलदोव्हा येथून हे भारतीय नागरिक विमानाने मायदेशी परतले आहेत. त्यापैकी, केवळ रोमानिया येथून 29 विमानांचे भारताच्यादिशेने उड्डाण झाल्याची माहिती नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली.
Evacuated 6222 Indians in last 7 days from Romania & Moldova. Got a new airport to operate flights in Suceava (50 km from border) instead of transporting students to Bucharest (500 km from border). 1050 students to be sent home in next 2 days: Jyotiraditya Scindia said in a tweet pic.twitter.com/K4jaa5tjvN
— ANI (@ANI) March 5, 2022
युक्रेनच्या पूर्व भागात अडकलेल्या भारतीयांना आत्तापर्यंत 500 किमीचा प्रवास करुन बुचारेस्ट येथे यावे लागत होते. मात्र, आता सीमारेषेपासून केवळ 50 किमी अंतरावर असलेल्या सुकेव्हा इथपर्यंतच भारतीयांना यावे लागणार आहे. कारण, सुकेव्हा येथे विमानतळ आढळून आल्याने वायू सेनेकडून येथूनच भारताच्या दिशेने विमानाचे उड्डाण करण्यात येईल, असे ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितले. तसेच, पुढील 2 दिवसांत 1050 भारतीय विद्यार्थ्यांची घरवापसी होणार असल्याचंही ते म्हणाले.