युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशात आणले जात असून आत्तापर्यंत ‘ऑपरेशन गंगा’द्वारे आतापर्यंत ४८ फेऱ्यांद्वारे १० हजार ३०० भारतीयांना परत आणण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी शनिवारी भारतीय वायू सेनेकडून ४, तर इतर विमानांच्या ११ फेऱ्या होणार असल्याची माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिली होती. आता, युक्रेनजवळील सुकेव्हा येथे भारतीय वायूसेनेले नवीन विमानतळ आढळू आले आहे. त्यामुळे, आता या ठिकाणाहून भारतीयांना मायदेशी परत आणले जाणार आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले, पूर्व युक्रेनमधील संघर्षमय भागातून भारतीयांना सुरक्षित परत आणण्यास आमचे प्राधान्य आहे. भारतीयांना बाहेर काढता यावे, यासाठी मार्ग काढण्याबाबत आम्ही दोन्ही देशांना सातत्याने विनंती करीत आहोत. स्थानिक युद्धबंदी हा पर्याय असू शकतो. भारताने पहिली ॲडवायजरी जारी केल्यानंतर सुमारे २० हजार भारतीय बाहेर पडल्याचे बागची यांनी सांगितले. तर, गेल्या 7 दिवसांत ऑपरेशन गंगा या मोहिमेंतर्गत 6222 भारतीयांना मायदेशी आणण्यात आले आहे. रोमानिया आणि मोलदोव्हा येथून हे भारतीय नागरिक विमानाने मायदेशी परतले आहेत. त्यापैकी, केवळ रोमानिया येथून 29 विमानांचे भारताच्यादिशेने उड्डाण झाल्याची माहिती नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली.