Russia-Ukraine War: 'भारत माता की... म्हणताच 'जय'घोष झाला, मोदींचे नाव घेताच..." माजी IAS अधिकाऱ्याची टिप्पणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 10:19 PM2022-03-03T22:19:05+5:302022-03-04T13:23:55+5:30
समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून माजी आयएएस अधिकारी सूर्य प्रताप सिंह यांनी केली खोचक टिप्पणी....
नवी दिल्ली - रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे (Russia-Ukraine War) हजारो भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने 'ऑपरेशन गंगा'(Operation Ganga) सुरू केले आहे. या अंतर्गत आतापर्यंत हजारो भारतीयांना परत आणले जात आहे. त्यासाठी, युक्रेनशेजारील राष्ट्रांमध्ये भारताचे 4 केंद्रीयमंत्री पोहोचले असून ते भारतीयांना धीर देत आहेत. तर वायूसेनेच्या विमानातूनही देशवापसी सुरू आहे. या देशवापसी दरम्यान युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हिडिओत भारतीय वायूदलाच्या विमानात बसलले मायदेशी रवाना होण्यासाठी युक्रेनजवळील राष्ट्रांतून भारतीय विद्यार्थी, नागरिक दिसत आहेत. यावेळी, व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असून थकवाही जाणवत आहेत. त्यातच, माईकमध्ये भारत माता की... असा आवाज येताच विद्यार्थी मोठ्या जोशाने जय... असा प्रतिसाद देताना दिसून येतात. मात्र, माननीय मोदीजी झिंदाबाद.. माननीय मोदीजी झिंदाबाद... म्हणताना या विद्यार्थ्यांचा आवाज कमी झाल्याचे दिसून येते. त्यावर माजी आयएएस अधिकाऱ्याने खोचक टिप्पणी केली आहे.
युक्रेन से लौटे बच्चों ने 'भारत माता की जय' तो बोली लेकिन 'मोदी जी की जय' के जवाब में चुप रहे, मुस्कुरा दिए।
— Surya Pratap Singh IAS Rtd. (@suryapsingh_IAS) March 3, 2022
बेशर्मों की गज़ब बेइज्जती की।
वाह, बच्चों! 👏 pic.twitter.com/bKGCtJDUTW
मोदींचा जयजयकार करताना विद्यार्थी गप्प राहिल्याचे सूर्य प्रताप सिंग यांनी म्हटले आहे. तर, व्हिडिओतही मोदींचा जयजयकार करताना विद्यार्थ्यांचा जोशपूर्ण आवाज नसल्याचे स्पष्ट ऐकून येत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
'ऑपरेशन गंगा'टीमचे काम सुरू
केंद्र सरकारने 'ऑपरेशन गंगा' अंतर्गत 80 उड्डाणे तैनात केली आहेत. या मिशनवर देखरेख ठेवण्यासाठी दोन डझनहून अधिक मंत्र्यांची नियुक्ती केली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी सरकारने बचाव कार्याला गती दिली आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, अधिकाधिक भारतीयांना आणण्यासाठी सर्व फ्लाइट्सच्या फेऱ्याही वाढवण्यात आल्या आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी 10 मार्चपर्यंत एकूण 80 उड्डाणे तैनात करण्याचे नियोजन आहे. ही उड्डाणे एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, इंडिगो, स्पाइस जेट, विस्तारा, गो एअर आणि एअर फोर्सची आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथून 35 विमाने निघण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यात एअर इंडियाच्या 14, एअर इंडिया एक्स्प्रेसची 8, इंडिगोची 7, स्पाइसजेटची 1, विस्ताराची 3 आणि भारतीय हवाई दलाची 2 उड्डाणे आहेत.