Russia Ukraine War : भयावह! जीव वाचवण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांची धडपड; जाळताहेत स्वतःचच सामान, 'हे' आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 12:21 PM2022-03-05T12:21:05+5:302022-03-05T12:33:19+5:30

Russia Ukraine War : परतलेल्या विद्यार्थ्यांची व्यथा ऐकून तिथे किती भयावह परिस्थिती आहे, याचा अंदाज येईल.

russia ukraine war burnt our luggage to feel warmth indian students share ordeal of escape and survival | Russia Ukraine War : भयावह! जीव वाचवण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांची धडपड; जाळताहेत स्वतःचच सामान, 'हे' आहे कारण

Russia Ukraine War : भयावह! जीव वाचवण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांची धडपड; जाळताहेत स्वतःचच सामान, 'हे' आहे कारण

Next

नवी दिल्ली - रशिया-युक्रेन युद्धात युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना पुन्हा भारतात आणले जात आहे. परतलेल्या विद्यार्थ्यांची व्यथा ऐकून तिथे किती भयावह परिस्थिती आहे, याचा अंदाज येईल. 22 वर्षीय आदित्य, जो युक्रेनमधील टेर्नोपिल नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये दुसऱ्या वर्षात शिकत आहे. त्याने आपला अनुभव सांगितला आहे. "युद्धग्रस्त भागातून शेजारच्या देशांच्या सीमेवर जाणाऱ्या मुला-मुलींचे शरीर थंडीने गोठत आहे. पायी जाताना किंवा टॅक्सीने जाताना आपले सामान त्यांना सोडून जावं लागत आहे. थंडीपासून संरक्षण व्हावं यासाठी रस्त्यावर पडलेलं आणि प्रसंगी स्वतःच सामान जाळून विद्यार्थी जीव वाचवत आहेत. यात कोणाकडे खायला आहे, तर कोणी इतरांना वाटून आपली तहान भूक भागवत आहे" असं म्हटलं आहे. 

3 मार्च रोजी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर विशेष विमानाने उतरलेल्या आदित्यच्या म्हणण्यानुसार, "ज्यावेळी 24 फेब्रुवारीला युद्ध सुरू झाले तेव्हा मी सर्वजण युक्रेनच्या सीमेकडे धावताना पाहिले. आम्ही 5 मित्रांनीही तिथून निघायचं ठरवलं. पोलंडची शेनी सीमा आपल्यापासून सुमारे 200 किलोमीटर अंतरावर आहे. आम्ही दोघांनी मिळून टॅक्सीने जायचे ठरवले. पण टॅक्सी चालकाने आम्हाला तिथून खूप दूर सोडले. त्यानंतर 2-3 दिवस पायी प्रवास करावा लागला. शेनी चौक सीमेच्या आधी सुमारे 3 किलोमीटर आहे. तिथे आम्हाला थांबवण्यात आलं, आमच्यासोबत गैरव्यवहार झाला. इतर विद्यार्थी 4-4 दिवस बसून असल्याचे पाहिले. ते पार करण्याची वाट पाहत होते. आम्ही आशा सोडून दिल्या होत्या, पुन्हा टेर्नोपिलला परत जावंसं वाटलं. मात्र, 6-7 तासांनंतर आम्हाला सीमा ओलांडण्याची परवानगी मिळाली.

"शरीर थंडीने गोठलं, अन्न-पाणी, गरजेच्या वस्तू संपल्या"

"वाटेत आमच्याकडे अन्न-पाणी आणि इतर गरजेच्या वस्तू संपू लागल्या. मग आम्ही सर्वत्र पडलेल्या इतर लोकांच्या सापडलेल्या गोष्टींमधून आमच्या कामाच्या गोष्टी वापरल्या. वाटेत पडलेल्या इतर आणि कमी वापराच्या वस्तू जाळून शरीर उबदार ठेवण्याची व्यवस्था केली"  असं देखील म्हटलं आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, बरेच लोक अद्याप युक्रेनमध्ये कुठे आहेत, हे शोधणं बाकी आहे. त्यात त्याचा मित्र हिमेश आहे. तो 9 दिवसांपासून बेपत्ता आहे. तो अवघ्या 3 महिन्यांपूर्वी युक्रेनमध्ये शिक्षणासाठी आला होता. मेडिकलच्या पहिल्या वर्षात शिकत होता. आता कुठे, कोणत्या अवस्थेत असेल मला माहीत नाही.

"आजूबाजूला स्फोटाचे आवाज, प्रचंड भीतीसह 2 दिवस पायी चाललो"

19 वर्षीय इकराही आदित्यसोबत परतली आहे. 'इंडिया टुडे'शी संवाद साधताना ती म्हणाली, 'आमच्या कॉलेजच्या समन्वयकाने आम्हाला खूप मदत केली. त्यांनी आमच्यासाठी बसची व्यवस्था केली. जेणेकरून आम्ही रोमानिया सीमेपर्यंत जाऊ शकू. मात्र, जिथून बस निघाली तिथून आम्ही 2 दिवस चालत सीमेवर पोहोचलो. दुसरा पर्याय नसल्याने आम्हाला आमचे सामान वाटेतच सोडावे लागले. खारकीव्हमध्ये शिकणाऱ्या माझ्या सहकारी विद्यार्थ्यांसाठी मला खूप भीती वाटते. जेव्हा युद्ध सुरू झाले तेव्हा आम्ही निघेपर्यंत आम्हाला आमच्या आजूबाजूला स्फोटाचे आवाज ऐकू येत होते. खारकीव्हमध्ये युद्ध शिगेला पोहोचले आहे. ते लोक कसे असतील माहीत नाही.'' हे सांगेपर्यंत इकरा भावूक झाली. ती युक्रेनमधील फ्रँकिश नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये शिकते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: russia ukraine war burnt our luggage to feel warmth indian students share ordeal of escape and survival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.