नवी दिल्ली - युक्रेनमधील २१९ भारतीयांना घेऊन मुंबईसाठी पहिले विमान रोमानियाहून रवाना झाले आहे. परराषट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी सांगितले की, युक्रेनहून सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आलेल्या २१९ भारतीयांसहमुंबईसाठी पहिले विमान रोमानियाहून रवाना झाले आहे. त्यांनी सांगितले की, आम्ही प्रयत्न करत आहोत. आमची टीम २४ तास काम करत आहे. मी स्वत: परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. युक्रेनवर झालेल्या रशियन हल्ल्यानंतर भारतीय नागरिक तिथे मोठ्या संख्येने अडकलेले आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे.
या सर्व लोकांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी सरकारने व्यापक पातळीवर प्रयत्न सुरू केले आहे. या सर्व मंडळींना रस्ते मार्गाने युक्रेनचे शेजारी देश असलेल्या देशांमध्ये पाठवले जाईल. त्यानंतर तिथून एअर इंडियाच्या विशेष विमानातून त्यांना भारतात आणले जाईल.
युक्रेनच्या सीमांमधून रस्ते मार्गाने आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताने हंगेरी पोलंड, स्लोव्हाक प्रजासत्ताक आणि रोमानिया यांच्यासोबत चर्चा केली आहे.