Russia Ukraine War: रशिया-यूक्रेन युद्धात भारतच मध्यस्थी करू शकतो; रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 09:44 PM2022-04-01T21:44:56+5:302022-04-01T21:45:25+5:30

दोन्ही देशांमधील युद्ध थांबवण्याचे आतापर्यंतचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत असं रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी म्हटलं आहे.

Russia Ukraine War: India can mediate in Russia-Ukraine war; Statement by the Foreign Minister of Russia | Russia Ukraine War: रशिया-यूक्रेन युद्धात भारतच मध्यस्थी करू शकतो; रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान

Russia Ukraine War: रशिया-यूक्रेन युद्धात भारतच मध्यस्थी करू शकतो; रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान

Next

नवी दिल्ली – यूक्रेनवर हल्ला करण्यापूर्वी रशियानं विचारही केला नसेल की हे युद्ध जवळपास महिनाभर चालेल. बलाढ्य रशियानं यूक्रेनवर हल्ला केला. त्यानंतर काही दिवसांत यूक्रेन रशियाच्या ताब्यात येईल असं म्हटलं जात होतं. परंतु यूक्रेनच्या नागरिकांचा कडवट प्रतिकार आणि झेलेन्स्की यांचा विश्वास या बळावर यूक्रेननं रशियाला अद्याप थोपवून धरलं आहे. त्यामुळे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचं गणित बिघडलं आहे. त्यात अमेरिकेसह नाटो देश प्रत्यक्षात या युद्धात उतरले नसले तरी त्यांनी यूक्रेनला पाठिंबा देत रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत.

यूक्रेनवर हल्ला करण्याची मोठी किंमत रशियाला चुकवावी लागत आहे. निर्बंधामुळे रशियावर आर्थिक संकट येण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे आता रशिया यूक्रेनबाबत नरमाईची भूमिका घेत असल्याचं दिसून येत आहे. यूक्रेनसोबत युद्ध संपवण्यासाठी रशियानं भारतासारख्या मित्राचा पर्याय पुढे आणला आहे. भारताशिवाय अन्य कुणीही रशिया-यूक्रेन युद्धात तडजोड करू शकत नाही. त्यामुळे भारताने युद्धात समोरासमोर आलेल्या देशांमध्ये मध्यस्थीची भूमिका करावी असं रशियानं म्हटलं आहे.

या बदल्यात रशिया आपले भारतासोबतचे संबंध नव्या उंचीवर नेण्याच्या मनस्थितीत आहे. हा बदल विशेषतः व्यावसायिक क्षेत्रात होऊ शकतो. ऐतिहासिकदृष्ट्या दोन्ही देश आपापल्या चलनात व्यापाराला प्रोत्साहन देऊ शकतात (India Russia Trade) रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. युक्रेनसोबतच्या युद्धादरम्यान रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी ही भेट दिली. त्यांना भारताकडून खूप आशा आहेत हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होते. यामध्ये व्यवसायापासून युद्धातील सलोख्यापर्यंतच्या अपेक्षा असल्याचं समोर येते. मॉस्को आणि कीव्हमध्ये भारत मध्यस्थी करू शकतो असं रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.



 

सर्गेई लावरोव यांचं म्हणणे महत्त्वाचं आहे कारण दोन्ही देशांमधील युद्ध थांबवण्याचे आतापर्यंतचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. त्यांनी भारत हा एक महत्त्वाचा देश आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये मध्यस्थाची भूमिका बजावू शकतो. या युद्धात भारत तटस्थ राहिला आहे. कोणत्याही टप्प्यावर त्यांनी रशियावर टीका करणे टाळले आहे. आजवर संयुक्त राष्ट्रात रशियाच्या विरोधात जे काही ठराव आले त्यातही भारताने सहभाग घेतलेला नाही. रशियाने भारताच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. भारतावर अमेरिकेच्या दबावामुळे त्यांच्या परस्पर संबंधांवर परिणाम होणार असल्याचं रशियाने स्पष्टपणे नाकारले आहे. भारत आणि रशिया यांच्यातील संबंध अतूट असल्याचे लावरोव यांनी म्हटलं आहे. यावर कोणाचाही दबाव चालणार नाही. तसेच युक्रेनमध्ये युद्ध नसून स्पेशल ऑपरेशन असल्याचं रशियानं म्हटलं आहे.

Web Title: Russia Ukraine War: India can mediate in Russia-Ukraine war; Statement by the Foreign Minister of Russia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.