Russia Ukraine war live: मोदींचा महत्वाचा निर्णय; विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी चार मंत्री युक्रेन शेजारच्या देशांमध्ये जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 12:11 PM2022-02-28T12:11:28+5:302022-02-28T12:11:49+5:30
Russia Ukraine war : आतापर्यंत ऑपरेशन गंगा अंतर्गत अनेक विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यात आलं आहे. परंतु अद्यापही हजारो विद्यार्थी युक्रेन आणि अन्य देशांच्या सीमांवर अडकले आहेत.
Russia Ukraine war : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेले अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी अडकले आहेत. त्यांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारनं ऑपरेशन गंगाची (Operation Ganga) सुरूवात केलीये. आता ही मोहीम अधिक जलदगतीनं राबवण्यासाटी मोदी सरकारमधील चार मंत्री युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांमध्ये जाणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान, त्या ठिकाणी अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी चार केंद्रीय मंत्री युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांमध्ये जाणार आहेत. हे मंत्री विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी समन्वय साधण्याचं काम पार पाडणार आहेत.
#WATCH | Prime Minister Narendra Modi calls a high-level meeting on the Ukraine crisis. Some Union Ministers may go to neighboring countries of Ukraine to coordinate the evacuations.#RussiaUkraineCrisispic.twitter.com/yqTFYwspxo
— ANI (@ANI) February 28, 2022
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य शिंदे, किरण रिजिजू आणि जनरल व्ही.के.सिंह हे युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांमध्ये विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी समन्वय कार्यासाठी जाणार आहेत. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारीही आपात्कालिन बैठक बोलावली होती. यादरम्यान, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि विदेश सचिव हर्षवर्धन श्रृंगला उपस्थित होते. विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि त्यांना त्या ठिकाणाहून बाहेर काढणं हे आपलं प्राधान्य असल्याचं पंतप्रधान मोदींनी या बैठकीदरम्यान सांगितलं.