शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

Russia-Ukraine War: कधी पुतीन यांच्या मागे हातावर हात धरून उभे राहिलेले मोदी; आज जुना फोटो होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2022 11:47 AM

Narendra Modi's old Photo with Vladimir Putin: हा फोटो २०१९ मध्ये मोदींनीच पोस्ट केला होता. मोदी मुख्यमंत्री असतानाचा तो फोटो आहे.

एखाद्या व्यक्तीचे दिवस कसे पलटतील याचा नेम नाही. कोण रंकाचा राव, तर कोण कधी रावाचा रंक होईल सांगता येत नाही. गेल्या काही वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काही फोटो व्हायरल होत आहेत. ते किती साधे होते, हातात काहीही नसताना कसे गुजरातचे मुख्यमंत्री झाले वगैरे वगैरे, परंतू कधी एके काळी पुतीन यांच्या पाठीमागे मोदी आपल्या पाठीवर हातावर हात घेऊन उभे असलेला फोटो आता व्हायरल होऊ लागला आहे. हा फोटोही खरा आहे. 

हा फोटो २०१९ मध्ये मोदींनीच पोस्ट केला होता. दोन दशकांपूर्वी वाजपेयींचे सरकार होते. नोव्हेंबर २००१ मध्ये माजी पंतप्रधान वाजपेयी रशियाच्या दौऱ्यावर गेले होते. तेव्हा तेव्हाचे गुजरात मुख्यमंत्री म्हणून मोदी देखील वाजपेयींसोबत गेले होते. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची वाजपेयींनी भेट घेतली.गुजरातमध्ये प्रकल्पासाठी पुतीन यांच्यासोबत करार होणार होता. या करारासाठी मोदींची सही लागणार होती. त्यासाठी मोदी वाजपेयींसोबत गेले होते. तेव्हा पुतीन यांना देखील वाटले नव्हते की हा माणूस पुढे १५ वर्षांनी याच देशाचा पंतप्रधान होईल. मोदी, पुतीन आणि मध्ये वाजपेयी असे एका टेबलवर बसले आणि मोदींनी करारावर सही केली. 

त्या आधी रशियासोबतच्या अन्य करारांवर वाजपेयी आणि पुतीन हे चर्चा आणि सही करत होते. तेव्हा मोदी या दोघांच्या मागे रांगेत पाठीमागे हातावर हात घेऊन उभे होते. आज मोदी पुतीन यांना युक्रेन युद्धाबाबत बोलण्यासाठी फोन करणार आहेत. हे अंतर पार करण्यासाठी मोदी यांना पंधरा वर्षे लागली. हे दाखविणारा हा फोटो आज व्हायरल होऊ लागला आहे. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिनNarendra Modiनरेंद्र मोदी