Russia-Ukraine War: 'ऑपरेशन गंगा'मध्ये 24 मंत्री, 80 उड्डाणे; 'असा' आहे भारतीयांच्या परतीचा पूर्ण प्लॅन...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 06:46 PM2022-03-03T18:46:36+5:302022-03-03T18:46:52+5:30

Operation Ganga: रशिया युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहे. गेल्या 8 दिवसांपासून रशियाने युक्रेनची मोठी हानी केली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारत सरकारने 'ऑपरेशन गंगा' सुरू केले आहे.

Russia-Ukraine War | Operation Ganga | Narenra Modi Government | 80 flights, 24 ministers in action to evacuate Indians from Ukraine | Russia-Ukraine War: 'ऑपरेशन गंगा'मध्ये 24 मंत्री, 80 उड्डाणे; 'असा' आहे भारतीयांच्या परतीचा पूर्ण प्लॅन...

Russia-Ukraine War: 'ऑपरेशन गंगा'मध्ये 24 मंत्री, 80 उड्डाणे; 'असा' आहे भारतीयांच्या परतीचा पूर्ण प्लॅन...

Next

नवी दिल्ली: रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे(Russia-Ukraine War) हजारो भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने 'ऑपरेशन गंगा'(Operation Ganga) सुरू केले आहे. या अंतर्गत आतापर्यंत हजारो भारतीयांना परत आणले जात आहे. केंद्र सरकारने 'ऑपरेशन गंगा' अंतर्गत 80 उड्डाणे तैनात केली आहेत. या मिशनवर देखरेख ठेवण्यासाठी दोन डझनहून अधिक मंत्र्यांची नियुक्ती केली आहे.

'ऑपरेशन गंगा'टीमचे काम सुरू
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी सरकारने बचाव कार्याला गती दिली आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, अधिकाधिक भारतीयांना आणण्यासाठी सर्व फ्लाइट्सच्या फेऱ्याही वाढवण्यात आल्या आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी 10 मार्चपर्यंत एकूण 80 उड्डाणे तैनात करण्याचे नियोजन आहे. ही उड्डाणे एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, इंडिगो, स्पाइस जेट, विस्तारा, गो एअर आणि एअर फोर्सची आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथून 35 विमाने निघण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यात एअर इंडियाच्या 14, एअर इंडिया एक्स्प्रेसची 8, इंडिगोची 7, स्पाइसजेटची 1, विस्ताराची 3 आणि भारतीय हवाई दलाची 2 उड्डाणे आहेत.

बुडापेस्ट येथून 28 उड्डाणे होणार 
हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथून एकूण 28 उड्डाणे होणार आहेत. या 28 पैकी 15 उड्डाणे गो एअरची, 9 इंडिगोची, 2 एअर इंडियाची, 1 भारतीय हवाई दलाची आणि 1 स्पाईसजेटची आहे. रझेजो, पोलंड येथून एकूण 9 उड्डाणे नियोजित आहेत, ज्यात इंडिगोची 8 उड्डाणे आणि भारतीय वायुसेनेची 1 उड्डाणे समाविष्ट आहेत, तर 5 उड्डाणे सुसेवा, रोमानिया आणि 3 उड्डाणे कोसिसिस, स्लोव्हाकिया येथून उड्डाण करतील. बुडापेस्ट, बुखारेस्ट आणि रझेजो, सुसेवा आणि कोसीस येथून उड्डाण करणार्‍या या 80 फ्लाइट्समधून सुमारे 17,000 अडकलेल्या भारतीयांना युक्रेनमधून बाहेर काढले जाईल, अशी सूत्रांची माहिती आहे.

आतापर्यंत 24 उड्डाणे भारतात आली 
'ऑपरेशन गंगा' अंतर्गत 2 मार्चपर्यंत एकूण 24 उड्डाणे भारतात आली आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी सरकारने 26 फेब्रुवारीला ‘ऑपरेशन गंगा’ सुरू केले. भारतीयांना घेऊन येणारे पहिले विमान 26 फेब्रुवारी रोजी मुंबईत दाखल झाले, ज्याचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी स्वागत केले होते. भारतीयांना बाहेर काढण्यासाठी पंतप्रधानांनी चार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, हरदीप सिंग पुरी, किरेन रिजिजू आणि व्हीके सिंग यांना हंगेरी, रोमानिया, स्लोव्हाकिया आणि पोलंडला पाठवले आहे. दिल्ली आणि मुंबई विमानतळावर ऑपरेशन गंगा अंतर्गत हंगेरी, रोमानिया, स्लोव्हाकिया आणि पोलंडमधून येणाऱ्या भारतीयांना सुरळीतपणे बाहेर काढण्यासाठी देखरेख करण्याची जबाबदारीही मोदी सरकारने मंत्र्यांना दिली आहे.

केंद्रीय मंत्र्यांकडे मोठी जबाबदारी
मंत्री जितेंद्र सिंह, मुख्तार अब्बास नक्वी, राव इंद्रजित सिंग, नारायण राणे, जी किशन रेड्डी, कैलाश चौधरी, पुरुषोत्तम रुपाला, भगवंत खुबा, वीरेंद्र कुमार, मीनाक्षी लेखी, व्ही. मुरलीधरन, भागवत कराड, निसीथ प्रामाणिक, रतनू साहिब ठाकूर, रतनू साहिब, दर्शन जरदोश, देवुसिंह चौहान, भारती प्रवीण पवार, साध्वी निरंजन ज्योती, भानु प्रताप सिंग वर्मा, सुभाष सरकार, कपिल पाटील यांना युक्रेनच्या शेजारील देशांतून भारतीयांना घेऊन जाणारी विमाने प्राप्त करण्याचे काम सोपवण्यात आले आहे.
 

Web Title: Russia-Ukraine War | Operation Ganga | Narenra Modi Government | 80 flights, 24 ministers in action to evacuate Indians from Ukraine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.