नवी दिल्ली: रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाचा आज 18वा दिवस आहे. युक्रेनची राजधानी कीववर रशियन सैन्याचा हल्ला सुरुच आहे. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या सुरक्षा सज्जतेचा आणि सध्याच्या जागतिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे देखील उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि इतर वरिष्ठ अधिकारीही सहभागी झाले होते.
‘ऑपरेशन गंगा’ मोहिमेअंतर्गत 19 हजार नागरिक परतलेयापूर्वी 28 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली होती. या बैठकीत पीएम मोदी म्हणाले की, भारत युद्धात अडकलेल्या शेजारी आणि विकसनशील देशांच्या लोकांना मदत करत राहील. सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे भारतीय नागरिक तेथे अडकले होते, त्यात बहुतांश विद्यार्थी होते. त्यांना परत आणण्यासाठी भारताने 'ऑपरेशन गंगा अभियान' सुरू केले आहे. 'ऑपरेशन गंगा' मिशन अंतर्गत भारताने आपल्या सुमारे 19,000 नागरिकांना परत आणले आहे.
रशियन सैन्याने डनिप्रो शहर उद्ध्वस्त केलेरशिया युक्रेनच्या विविध शहरांना सातत्याने लक्ष्य करत आहे. बॉम्ब आणि क्षेपणास्त्रे डागली जात आहेत. आजूबाजूच्या भागावर वर्चस्व मिळवल्यानंतर रशियन सैन्याने युक्रेनची राजधानी कीववर वर्चस्व मिळवण्यासाठी तयारी केली आहे. यातच रशियाने युक्रेनचे चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर डनिप्रोमध्ये क्षेपणास्त्रे डागली आहेत. तसेच, दक्षिण युक्रेनच्या मायकोलिव्ह भागात एकामागून एक स्फोट घडवून आणले जात आहेत.
अमेरिकेची 1500 कोटींची अतिरिक्त मदतअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन युक्रेनला 1500 कोटी रुपयांची अतिरिक्त मदत देण्याची तयारी करत आहेत. यातून युक्रेन अधिक आधुनिक शस्त्रे खरेदी करू शकेल आणि निर्वासितांना मदत करू शकेल. अशा परिस्थितीत युरोपीय देशांचे किंवा नाटो देशांचे सैन्य युक्रेनमध्ये उतरणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारे युक्रेनला स्वतःची लढाई लढावी लागेल.