Russia Ukraine War : 15 किमी पायी चालत बॉर्डरवर पोहोचलो, 13 तास रांगेत थांबलो; तरुणाने सांगितला 'तो' थरारक अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 02:58 PM2022-03-02T14:58:28+5:302022-03-02T15:11:34+5:30
Russia Ukraine War : कृष्णकांतने भारतात परत येण्याचा प्रवास अत्यंत कठीण असल्याचं म्हटलं आहे. त्याने आपला थरारक अनुभव सांगितला आहे.
नवी दिल्ली - रशिया आणि युक्रेनमधील वाद आता चिघळला आहे. युक्रेनमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान अनेक भारतीय विद्यार्थी अद्यापही तिथे अडकून राहिले आहेत. याच दरम्यान युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान ऑपरेशन गंगा अंतर्गत बरेलीचा एक विद्यार्थीही आपल्या घरी परतला आहे. बरेलीला परतल्यावर त्याच्या घरातील सर्वजण खूप आनंदी आहेत. कृष्णकांत प्रसाद असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो एमबीबीएसचा विद्यार्थी होता. कृष्णकांतने भारतात परत येण्याचा प्रवास अत्यंत कठीण असल्याचं म्हटलं आहे. त्याने आपला थरारक अनुभव सांगितला आहे.
कृष्णकांतने युक्रेनमधील परिस्थिती अत्यंत भीषण असून तेथे सतत बॉम्बस्फोट होत आहेत. अशा परिस्थितीत तेथून बॉर्डरवर पोहोचणे खूप त्रासदायक आहे असं म्हटलं आहे. तसेच कृष्णकांत प्रसाद हा युक्रेनच्या इव्हानो-फ्रँकिव्हस्क शहरातील नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीच्या एमबीबीएसचा विद्यार्थी आहेत. कृष्णकांतने तो आणि त्याचे काही मित्र कसेतरी गाडीने रोमानियाच्या बॉर्डरवर पोहोचले. बॉर्डरच्या जवळपास 15 किलोमीटर आधी ट्रेन विद्यार्थ्यांना खाली उतरवते. तेथून विद्यार्थ्यांना पायी रोमानिया बॉर्डरवर जावे लागते असं म्हटलं आहे.
बॉर्डरवर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी
बॉर्डरवर गेल्यावरही बराच वेळ रांगेत उभे राहावे लागते. कृष्णकांतला जवळपास 13 तास रांगेत उभं राहावं लागलं. बॉर्डरवर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते, त्यामुळे तेथील पोलीस चेकिंग करतात आणि चेकिंगसाठी लांबच लांब रांगेत उभे राहावे लागते. विमानतळावर जाण्यासाठी त्याच बॉर्डरवर बसची व्यवस्था करण्यात आली होती, त्यासाठी कोणतेही भाडे आकारण्यात आले नाही. त्यानंतर विमानतळावरून विमानाने दिल्लीला आल्यानंतरही भाडे आकारण्यात आले नाही. दिल्लीतील यूपी भवनातून कारची व्यवस्था सरकारने केली होती, यामुळे कृष्णकांत सुखरूप बरेलीला पोहोचला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"...आणि तेच आमचं शेवटचं बोलणं ठरलं"; नवीनच्या मित्राने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
युक्रेनमधील खार्किव येथे झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. मंत्रालय या विद्यार्थ्याच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहे. नवीन शेखरप्पा असे मृताचे नाव आहे. तो 21 वर्षांचा होता. नवीन कर्नाटकातील हावेरी येथील चालगेरी येथील रहिवासी होता. बचावादरम्यान झालेल्या हल्ल्यात नवीनचा मृत्यू झाला. याच दरम्यान त्याच्या एका मित्राने मृत्यू नेमकं काय घडलं ते सांगत आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. नवीनचं मृत्यूआधी त्याचा जवळचा मित्र आणि रुममेट असलेल्या श्रीकांतसोबत फोनवर बोलणं झालं होतं.