Russia vs Ukraine War: तेव्हा कारगिल, आता युक्रेन! युद्ध होणार हे १६ महिन्यांपूर्वीच सांगितलेले; 'हा' ज्योतिषी आला चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 04:29 PM2022-03-03T16:29:11+5:302022-03-03T16:29:33+5:30
Russia vs Ukraine War: भारतीय ज्योतिषानं १६ महिन्यांपूर्वी केलेली भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली
मॉस्को: युक्रेन विरुद्ध रशिया युद्ध आठवड्याभरानंतरही सुरुच आहे. रशियानं युक्रेनचं प्रचंड मोठं नुकसान केलं आहे. युक्रेनी सैन्य बलाढ्य रशियन फौजेचा मुकाबला करत आहे. जगप्रसिद्ध भविष्यवेत्ता बाबा वेंगा यांनी रशियासंदर्भात एक भविष्यवाणी केली होती. रशियाच्या पुढे कोणीही टिकू शकणार नाही. ही भविष्यवाणी खरी होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे भारतातल्या एका ज्योतिषानंदेखील १६ महिन्यांपूर्वीच एक भविष्यवाणी केली होती. युरोपात युद्ध होईल, असं भविष्य त्यांनी सांगितलं. ते खरं ठरताना दिसत आहे.
पंडित इंदू शेखर शर्मा यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली आहे. शर्मा यांनी एका पुस्तकात याचा उल्लेख केला होता. त्या पुस्तकाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पंडित इंदू शेखर शर्मा पंजाबचे रहिवासी आहेत. ते ग्रेटर मोहालीतल्या कुरालीमध्ये वास्तव्यात आहेत. त्यांनी १६ महिन्यांपूर्वीच युद्धाची भविष्यवाणी केली होती.
ऑक्टोबर २०२० मध्ये 'वार्षिक ज्योतिषीय भविष्यवाणी'चं प्रकाशन झालं. ८० वर्षांच्या इंदू शेखर शर्नांचं कुटुंब ९५ वर्षांपासून वार्षिक ज्योतिषीय भविष्यवाणी पुस्तकाचं प्रकाशन करत आहे. २६ फेब्रुवारी ते ७ एप्रिल २०२२ दरम्यान मकर राशीत शनी आणि मंगळाची उपस्थिती आहे. त्याचा परिणाम म्हणून युद्ध होईल. त्यामुळे जगाची शांतता भंग होईल. पुस्तकाच्या ५४ व्या पानावर ही भविष्यवाणी करण्यात आली होती. या पानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
इंदू शेखर शर्मांनी सांगितलेलं भविष्य खरं ठरण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी सांगितलेलं भविष्य खरं ठरलं आहे. लाल बहादूर शास्त्री आणि अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना युद्ध होईल, असं भविष्य शर्मांनी सांगितलं होतं. ते खरं ठरलं होतं.