Russia vs Ukraine War: शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी अन् पोलँडच्या राजदूतांमध्ये तू तू मै मै
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 07:54 PM2022-03-01T19:54:35+5:302022-03-01T19:56:29+5:30
शिवसेना नेत्या आणि खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी भारतीय विद्यार्थ्यांच्या त्रासासंदर्भात ट्विट केलं आहे
मुंबई - भारतीय विदेश मंत्रालयाने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार युक्रेनमधून आत्तापर्यंत 6 विमानांचे उड्डाण झाले असून 1400 भारतीय नागरिकांची देशवापसी करण्यात आली आहे. मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत माहिती देताना 4 विमानांचे उड्डाण झाल्याचे सांगितले. रोमानियातील बुखारेस्ट आणि हंगरी येथून दोन-दोन विमानांचे उड्डाण झाले आहे. परिस्थिती बिकट असून गतीमानतेनं नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. मात्र, केंद्र सरकारच्या या प्रयत्नांवरुन शिवसेनेनं टीका केली आहे.
शिवसेना नेत्या आणि खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी भारतीय विद्यार्थ्यांच्या त्रासासंदर्भात ट्विट केलं आहे. या ट्विटनंतर पोलंडच्या राजदूतांनी प्रियंका चतुर्वैदी यांनी प्रत्युत्तर दिलंय. यावरुन दोघांमध्ये चांगलंच तू तू मै मै पाहायला मिळालं. खासदार प्रियंका यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीची मागणी केली. तसेच, सोमवारी सायंकाळी 5 वाजता, पोलंड आणि लिथुआनिया व पराराष्ट्र मंत्रालयास मेन्सनही केलं होतं.
Madam, this is absolutely not true. Polish government did not deny anyone to enter from the border with Ukraine.
— Adam Burakowski (@Adam_Burakowski) February 28, 2022
Please check your sources.
Please do not spread #FakeNews
बहुतांश भारतीयांना पोलांडमध्ये येण्यास मनाई केली जात आहे, ज्या विद्यार्थ्यांना रविवारी परवानगी देण्यात आली होती, त्यांनाही परत पाठविण्यात आले आहे. त्यामुळे, घरात चिंताग्रस्त असलेले त्यांचे आई-वडिल घाबरले आहेत. ऑपरेशन गंगा आणि भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याकडे लक्ष द्यावे, असे ट्विट प्रियंका यांनी केलं होतं. त्यास, पोलांडचे राजदूत एडम बुराकोव्स्की यांनी प्रत्युत्तर दिलंय.
Sir, with all due respect, that’s not what I have been told by the students. Unfortunate that you called it fake news, will be happy to share numbers&names of those people stranded. And I’d appreciate before screaming fake news having the basic etiquette to reaching out. Thanks.— Priyanka Chaturvedi🇮🇳 (@priyankac19) February 28, 2022
मॅडम, आपला आरोप सत्य नाही, पोलंड सरकारने युक्रेनलगतच्या सीमारेषेवर कुणालाही अडवलं नाही. त्यावर, पुन्हा चतुर्वेदी यांनी ट्विट करुन कृपया तुमच्या सुत्रांकडून माहिती घ्या, फेक न्यूज पसरवू नका, असे म्हटले. त्यानंतर, प्रियंका यांनी पुन्हा ट्विट करत माझ्याकडे काही विद्यार्थ्यांचे मोबाईल नंबर आणि त्यांची नावे आहेत, ते मी आपल्यासोबत शेअर करते, असेही त्यांनी म्हटलं. त्यांच्या या ट्विटला पुन्हा बुराकोव्स्की यांनी प्रत्युत्तर दिलंय. तसेच, मला संपर्क करावा, मी माझा नंबर जाहीरपणे येथे देऊ शकत नाही, असे त्यांनी म्हटलं. दरम्यान, हे ट्विटयुद्ध चागलेच रंगले होते.