ऑनलाइन लोकमत
आग्रा, दि. ११ - सासूने घरात प्रवेश नाकारला म्हणून उपोषणाला बसलेल्या रशियन सूनेला अखेर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या हस्तक्षेपानंतर न्याय मिळाला आहे. मूळची रशियन असलेली ओल्गा इफिमेनकोव्हा शनिवारपासून आग्र्यातील सासू-सास-यांच्या घराबाहेर पती आणि तीन वर्षाच्या मुलासोबत बेमुदत उपोषणाला बसली होती.
सासूने ओल्गाला संपत्तीमधील वाटा आणि घरात प्रवेश नाकारला होता. यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली. या घटनेमुळे देशाच्या प्रतिमेवर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.
या टिवटनंतर आग्रा पोलिसांनी हस्तक्षेप करत सासू-सूनेची दिलजमाई घडवून आणली. ओल्गाने २०११ मध्ये विक्रांत सिंह चंडेलबरोबर विवाह केला. त्यांना एक मुलगा आहे. विक्रांत आणि ओल्गा दोघेही गोव्यामध्ये रहात होते. तिथे त्यांचा बिझनेस होता. पण बिझनेसमध्ये नुकसान झाल्यामुळे ते पुन्हा आग्र्याला परतले.
जेव्हा हे दांम्पत्य घरी पोहोचले तेव्हा विक्रांतची आई निर्मला चांडेल यांनी प्रवेश नाकारला निर्मला यांनी सर्व संपत्ती मुलीच्या नावावर केली आहे. यानंतर ओल्गा नवरा आणि मुलासह घराबाहेरच उपोषणाला बसली होती.
Thank you Akhilesh ji for resolving this. Such incidents affect country's image. @yadavakhileshhttps://t.co/LpKvOTEi9F— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) July 10, 2016