नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर देशात अद्यापही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. नवीन कोरोना रुग्णांची संख्या किंचित कमी होताना दिसत असली, तरी कोरोनामुळे वाढती मृत्यूंची संख्या चिंताजनक ठरत चालली आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे व्हेंटिलेटर्स, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, कोरोना लसीचा तुटवडा जाणवत आहे. मात्र, दुसरीकडे आता ‘सिंगापूर’ स्ट्रेनवरुन आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुनावले आहे. (s jaishankar criticizes arvind kejriwal over singapore corona strain)
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेवरून सतर्कताही वाढली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक ट्वीट करत सिंगापुरमधील कोरोनाचा नवा स्ट्रेन हा लहान मुलांसाठी अधिक धोकादायक असल्याचे म्हटले जात असल्याचे सांगितले. तसेच भारतात हा स्ट्रेन तिसऱ्या लाटेच्या रूपात येऊ शकतो, असेही ते म्हणाले. केजरीवालांच्या या ट्वीटला सिंगापूरच्या दुतावासाने उत्तर देत भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांना तलब केले. मात्र, यावरून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे.
YouTube कडून महिन्याला ‘इतके’ पैसे मिळतात; नितीन गडकरींनी सांगितला कमाईचा आकडा
मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य अधिकृत नाही
सिंगापूर आणि भारत दोन्ही देश कोरोनाविरोधातील लढत आहेत. कोरोनाच्या लढाईत भारताला केलेल्या मदतीबाबत सिंगापूरचे आभार. सिंगापूर सैन्याकडून विमानाने भारतात आलेली मदत दोन्ही देशांच्या नाते किती घट्ट आहे, हे दर्शवते. मात्र, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले विधान भारताचे अधिकृत वक्तव्य नाही, असे स्पष्ट करू इच्छितो, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सिंगापूरच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलेल्या ट्विटवर प्रतिक्रिया देत सांगितले. तसेच दुसरे एक ट्विट करून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.
केजरीवालांचे वक्तव्य बेजबाबदारपणाचे
तथापि, अशा प्रकारची बेजबाबदार वक्तव्ये दोन देशांच्या दीर्घकाळापासून चालत आलेल्या भागीदारी आणि संबंधांवर परिणाम करू शकतात, हे समजायला हवे. दिल्लीचे मुख्यमंत्री भारतासंदर्भात मते मांडू शकत नाही, असे स्पष्ट करतो, या शब्दांत एस. जयशंकर यांनी अरविंद केजरीवाल यांना सुनावले आहे.
बिहारमध्ये PM केअर्समधील २५ व्हेंटिलेटर ९ महिनांपासून धूळखात; एकदाही वापर नाही!
काय म्हणाले होते केजरीवाल?
सिंगापूरमध्ये लहान मुलांमध्ये आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन लहान मुलांसाठी अतिशय धोकादायक मानला जात आहे. भारतात तो तिसऱ्या लाटेच्या रूपात येऊ शकतो. सिंगापूरसोबत सुरू असलेला हवाई प्रवास तात्काळ प्रभावाने थांबवावा आणि मुलांसाठी लसीकरणाच्या पर्यायांवर प्राधान्यायनं काम करावे, अशा सूचना केजरीवाल यांनी केंद्र सरकारला केल्या होत्या.
तौक्ते चक्रीवादळ उत्तरेतही परिणाम; राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज
दरम्यान, सिंगापूरमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आल्याच्या दाव्यात कोणतेही तथ्य नाही. गेल्या आठवड्यामध्ये सिंगापूरमध्ये आढळलेल्या कोरोनाबाधिक रुग्णांमध्ये B.1.617.2 हा व्हेरिअंटचआढळला आहे. फिलोजेनेटिक चाचणीतून हे सिद्ध झाले आहे. या विषाणूची निर्मिती ही भारतातूच झाली आहे, असे सिंगापूरच्या भारतातील दुतावासाने सिंगापूरच्या आरोग्य विभागाच्या माहितीचा हवाला देत म्हटले.