'1984 मध्ये खूप काही झालं, त्यावर डॉक्युमेंट्री का बनवली नाही?', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 07:56 PM2023-02-21T19:56:00+5:302023-02-21T19:56:10+5:30

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरात दंगलीवरील बीबीसी डॉक्युमेंट्रीवर स्पष्टपणे भाष्य केले.

S Jaishankar news: 'A lot happened in 1984, why wasn't a documentary made on it?', Foreign Minister Jaishankar's big statement | '1984 मध्ये खूप काही झालं, त्यावर डॉक्युमेंट्री का बनवली नाही?', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे मोठे विधान

'1984 मध्ये खूप काही झालं, त्यावर डॉक्युमेंट्री का बनवली नाही?', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे मोठे विधान

googlenewsNext

MEA S Jaishankar: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरात दंगलीवरील बीबीसी डॉक्युमेंट्रीच्या वादावर मोठे वक्तव्य केले आहे. पंतप्रधान मोदी आणि भारताबाबत पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांकडून काही दिवसांपासून काही ना काही चर्चा सुरू आहे. यावर जयशंकर म्हणाले की, टायमिंग अॅक्सीडेंटल आहे, असे तुम्हाला वाटते का? भारतात निवडणुकीचा हंगाम सुरू झाला आहे की नाही माहीत नाही, पण लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये मात्र नक्कीच सुरू झाला आहे. हे राजकारण त्या लोकांची चाल आहे ज्यांना राजकीय क्षेत्रात उतरण्याची हिंमत नाही.

एएनआयच्या मुलाखतीत जयशंकर पुढे म्हणतात, काही रिपोर्ट आणि विचारांमध्ये अचानक वाढ का झाली? म्हणजे, या आधी काही गोष्टी घडत नव्हत्या का? 1984 मध्ये दिल्लीत खूप काही घडले होते, त्यावर आपण डॉक्युमेंट्री का पाहत नाही? मी खूप मानवतावादी आहे आणि माझा विश्वास आहे की ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे. अशा अजेंड्याला बळी पडू नका. राजकीय क्षेत्रात उतरण्याची हिंमत नसलेल्या लोकांकडून हे राजकारण खेळले जात आहे. 

जयशंकर पुढे म्हणतात की, काही वेळा भारताचे राजकारण केवळ देशाच्या सीमेतच होत नाही, तर ते बाहेरुनही घडते. आम्ही केवळ एखाद्या माहितीपटावर, एखाद्या युरोपियन शहरात दिलेल्या भाषणावर किंवा कोठेतरी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या भाषणावर चर्चा करत नाही. आपण राजकारणात वाद घालत आहोत, जो प्रसारमाध्यमातून चुकीचा दाखवला जात आहे. अशा प्रकारे भारताची, सरकारची, भाजपची, पंतप्रधानांची अतिरेकी प्रतिमा कशी आकाराला येते हे तुम्हाला कळेल. एका दशकापासून हे चालू आहे, असेही ते म्हणाले.


 

Web Title: S Jaishankar news: 'A lot happened in 1984, why wasn't a documentary made on it?', Foreign Minister Jaishankar's big statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.