S. Jaishankar on Canada-India : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी भारत आणि कॅनडादरम्यान सुरू असलेल्या वादावर अखेर मौन सोडले. एका कार्यक्रमात बोलताना एस जयशंकर म्हणाले की, कॅनडानेभारतीय उच्चायुक्तांना पोलिस तपासासाठी विचारले होते. त्यामुळेच, भारताने आपले उच्चायुक्त परत बोलावण्याचा निर्णय घेतला.
कॅनडाचे उच्चायुक्त भारतात येतात आणि आपल्या लष्कर आणि पोलिसांची माहिती गोळा करतात, तेव्हा त्यांना कोणतीही अडचण नसते. पण, आपल्या उच्चायुक्तांवर निर्बंध लादले जातात, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
दोन्ही देशांमधील स्वातंत्र्य आणि परकीय हस्तक्षेप या दुहेरी धोरणांवरही जयशंकर यांनी टीका केली. ते म्हणाले, जेव्हा भारतीय पत्रकार सोशल मीडियावर टिप्पणी करतात, तेव्हा ते स्वातंत्र्याच्या श्रेणीत मानले जातात, परंतु जर कोणी म्हटले की कॅनडाचे उच्चायुक्त साऊथ ब्लॉकमधून रागाच्या भरात बाहेर पडले, तर तो परकीय हस्तक्षेप मानला जातो.
जागतिक व्यवस्था पाश्चात्य वर्चस्वापासून मुक्त होत असल्याचेही परराष्ट्रमंत्र्यांनी नमूद केले. ते म्हणाले, भारत आणि चीनसारख्या मोठ्या देशांच्या वाढत्या सहभागामुळे गेल्या 20-25 वर्षांमध्ये जगामध्ये पुनर्संतुलन निर्माण झाले आहे. ही प्रक्रिया सोपी असणार नाही आणि त्यामुळे काही वाद आणि संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. पाश्चिमात्य आणि बिगर पाश्चिमात्य देशांमधील संबंध बदलत असून, हा बदल सोपा नसेल, असेही परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पुढे म्हणाले, "पाकिस्तानच्या दौऱ्यावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले, "मी त्यांना (नवाज शरीफ) भेटलो नाही. मी तिथे एससीओच्या बैठकीसाठी गेलो होतो... एससीओच्या अध्यक्षपदासाठी आम्ही पाकिस्तानला खूप पाठिंबा दिला... 'तिथे पोहोचलो, सगळ्यांना भेटलो, हस्तांदोलन केले, चांगली भेट घेतली आणि परत आलो...'