S Jaishankar on Pakistan: एससीओ परिषदेत (SCO Summit) सहभागी होण्यासाठी गोव्यात आलेले पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो (Bilawal Bhutto) यांना भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी तीव्र शब्दात फटकारले. एस जयशंकर (S Jaishankar) यांनी पाकिस्तानला दहशतवाद उद्योगाचा प्रमोटर, संरक्षक आणि प्रवक्ता म्हटले. बिलावलशी हस्तांदोलन करण्याऐवजी त्यांनी दुरुनच नमस्कार केला. यादरम्यान दोन्ही देशांमधील संघर्ष स्पष्टपणे दिसत होता.
संबंधित बातमी- बिलाबल भुट्टो दहशतवादी देशाचे प्रवक्ते; एस जयशंकर यांनी केली पाकिस्तानची 'धुलाई'
बिलावल भुट्टो यांच्यासोबतच्या वादावर माध्यमांमध्ये सुरू असलेल्या सर्व चर्चांना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले की, बिलावल भुट्टो परराष्ट्र मंत्री म्हणून एससीओमध्ये आले होते. माझ्याकडे चांगला पाहुणे आला, तर मी त्याच्यासाठी चांगला यजमान असेल.
खरं तर, एससीओ बैठकीनंतर जयशंकर यांनी पत्रकार परिषदेत पाकिस्तान आणि बिलावल यांच्यावर जोरदार टीका केली आणि म्हणाले की एससीओ बैठकीत बिलावल यांना परराष्ट्र मंत्री म्हणून योग्य वागणूक देण्यात आली. पण, ते दहशतवादी कारवायांना चालना देणाऱ्या देशाचे प्रवक्ते आहेत. पाकिस्तानच्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवता येत नाही. दहशतवादाचा पीडित आणि कट रचणाऱ्यासोबत बसून चर्चा होऊ शकत नाहीत.