शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2024 5:18 PM

S Jaishankar Pakistan Visit :15 आणि 16 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानमध्ये SCO शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

S Jaishankar Pakistan Visit : भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर(S Jaishankar) पाकिस्तानमध्ये (Pakistan) आयोजित शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO)च्या बैठकीत सहभागी होणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानमध्ये SCO शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 

पाकिस्तानने पाठवले निमंत्रण शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या कौन्सिल ऑफ हेड्स ऑफ गव्हर्नमेंट (CHG) चे अध्यक्षपद यंदा पाकिस्तानकडे आहे. त्यानुसार, पाकिस्तानने 15 आणि 16 ऑक्टोबररोजी SCO शिखर परिषदेचे आयोजन केले आहे. दरम्यान, पाकिस्तान सरकारने ऑगस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीचे निमंत्रण पाठवले होते.

पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच यांनी सांगितले की, 15-16 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बैठकीत सहभागी होण्यासाठी सदस्य देशांच्या प्रमुखांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. याअंतर्गत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. काही देशांनी या बैठकीत सहभागी होण्याची पुष्टी केली आहे, त्याबाबतची माहिती योग्य वेळी दिली जाईल.

वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये बैठकांच्या अनेक फेऱ्या होणार इस्लामाबादमध्ये होणाऱ्या या शिखर परिषदेपूर्वी, एक मंत्रीस्तरीय बैठक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीच्या अनेक फेऱ्या होतील, ज्यामध्ये SCO सदस्य देशांमधील आर्थिक, सामाजिक-सांस्कृतिक आणि मानवतावादी सहकार्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. दरम्यान, SCO मध्ये भारत, चीन, रशिया, पाकिस्तान, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान यांचा समावेश आहे.

गेल्या वर्षी भारताने यजमानपद भूषवले भारताने गेल्या वर्षी व्हर्च्युअल मोडमध्ये SCO शिखर परिषदेचे आयोजन केले होते. पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ ऑनलाइन सहभागी झाले होते. पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी मे 2023 मध्ये गोव्यातील परराष्ट्र मंत्र्यांच्या SCO परिषदेच्या 2 दिवसीय बैठकीला सहभाग नोंदवला होता. ते जवळपास 12 वर्षात भारताला भेट देणारे पहिले पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री होते.

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरPakistanपाकिस्तानIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी