शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहना सिंगची 'गगनचुंबी' झेप! बनली तेजस फायटर फ्लीटमधील पहिली महिला फायटर पायलट
2
'दगडूशेठ'च्या बाप्पांची श्री उमांगमलज रथातून सांगता मिरवणूक उत्साहात; भाविकांची झुंबड
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रावरील शस्त्रक्रिया यशस्वी; दुखापतग्रस्त हाताने खेळलेला 'डायमंड लीग'
4
अमेरिकेच्या प्रतिष्ठित हम्फ्रे फेलोशिप प्रोग्रामसाठी विजयलक्ष्मी बिदरी यांची निवड
5
लेबनॉनमध्ये साखळी बॉम्बस्फोट, 5 जणांचा मृत्यू तर 1200-1500 जखमी; इस्रायलवर संशय
6
अचलपूर तालुक्यात गणेश विसर्जना करण्यासाठी गेलेले दोन कर्मचारी पूर्णा नदीपात्रात गेले वाहून
7
हातगाडी लावण्यावरून चाकू हल्ल्यात एकाचा खून; कोल्हापूरच्या आराम कॉर्नर येथील घटना
8
जळगाव जामोदमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक, तरुण जखमी; पोलिसांचा हस्तक्षेप
9
तलावातील पाण्यामध्ये बुडून बाप-लेकाचा मृत्यू; लातूर जिल्ह्यातील माळहिप्परगा येथील घटना
10
गोळ्या झाडून पोलीस कर्मचाऱ्याने केला पत्नीचा खून; किरकोळ वादातून उचललं टोकाचं पाऊल
11
'पुढच्या वर्षी लवकर या'चा जयघोष, जळगावात जल्लोषात विसर्जन अन् सामाजिक संदेश
12
गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत दणदणाट अन् लखलखाट! कोल्हापुरात तुफान धामधूम
13
“बाहेर जाऊन देशाबाबत असे बोलणे शोभत नाहीत, राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करावा”: रामदास आठवले
14
'मला मेनोपॉझबद्दल वडिलांनी आधीच..' सुधा मूर्तींनी सांगितला मासिक पाळी अन् मेनोपॉझचा अनुभव
15
“भाजपाचा CM होणार असेल तर देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री”: गिरीश महाजन
16
Ganesh Visarjan 2024 Live: पुण्यातील मानाच्या पाचही गणपती बाप्पांचे विसर्जन
17
भारतात वेगाने वाढतीये करोडपतींची संख्या, ₹ 10 कोटी कमावणाऱ्यांच्या संख्येत 63 टक्क्यांनी वाढ
18
अमित शाह यांची हरियाणात अग्निवीरांसंदर्भात बडी घोषणा, नोकरीसंदर्भात दिली मोठी गॅरंटी
19
आगामी विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढणार; अजित पवार स्पष्टच बोलले
20
PM मोदींना वाढदिवसानिमित्त इटलीतून शुभेच्छा; जॉर्जिया मेलोनी काय म्हणाल्या? पाहा...

LAC वरून केव्हा हटणार चिनी आरमी? जयशंकर म्हणाले, 75% वाद मिटले, पण 'हा' एक मुद्दा अद्यापही कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 8:25 PM

जयशंकर म्हणाले, जून 2020 मध्ये गलवान व्हॅलीमध्ये जो संघर्ष झाला, त्याचा परिणाम आमच्या संबंधांवर झाला आहे. सीमेवर कुणालाही हिंसाचाराची परवानगी दिली जाऊ शकत नाही.

केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पूर्व लडाखमध्येचीनसोबत सुरू असलेल्या तणावासंदर्भात भाष्य केले आहे. 75% वाद मिटला आहे. मात्र, सीमेवर जमलेले चिनी सैनिक हा अद्यापही एक मोठा मुद्दा आहे, असे त्यांनी म्हटले आहे. स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे एका थिंक टँकशी चर्चा करताना ते बोलत होते. 

जयशंकर म्हणाले, जून 2020 मध्ये गलवान व्हॅलीमध्ये जो संघर्ष झाला, त्याचा परिणाम आमच्या संबंधांवर झाला आहे. सीमेवर कुणालाही हिंसाचाराची परवानगी दिली जाऊ शकत नाही. चीन जेव्हा आपले सैन्य मागे घेईल तेव्हाच संबंध सामान्य होऊ शकतात, ही एकमेव अट आहे.

जयशंकर म्हणाले, वाद सोडवण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान चर्चा सुरू आहे. यात काही प्रमाणात प्रगती झाली आहे. सुमारे 75 टक्के वादांवर उपाय शोधण्यात आले आहेत. दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने आहेत. याला कसे सामोरे जायचे आणि हा प्रश्न कसा सोडवायचा यावर दोन्ही देश चर्चा करत आहेत. एवढेच नाही, तर वाद संपुष्टात आल्यास चीन सोबतचे संबंध पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे होऊ शकतात. वादावर तोडगा निघाला तर शांतता आणि सौहार्द परत येऊ शकते, असेही जयशंकर यांनी म्हटले आहे. 

असे असेल पहिले पाऊल - जयशंकर म्हणाले, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) आजही चीनने सैन्य मोठ्या प्रमाणावर तैनात आहे. प्रत्युत्तरात आम्हीही आमच्या सैनिकांना वर पाठवले आहे. जेव्हा आम्ही कोरोनाचा सामना करत होतो, लॉकडाऊनमध्ये हतो, तेव्हा चीनने हे कृत्य केले आहे. हा अत्यंत धोकादायक प्लॅन होता. कारण एवढ्या उंचावर थंडीमध्ये सैनिकांची तैनाती केल्यास दुर्घटना होऊ शकतात आणि जून 2022 मध्ये हेच घडले. गलवानमध्ये सैनिकांमध्ये संघर्ष झाला. आमचा मुद्दा हा आहे की, चीनने असे कृत्य का केले. आपले सैनिक सीमेवर का पाठवले. आम्ही गेल्या चार वर्षांपासून चर्चा करत आहोत. मात्र आजही, परिस्थिती सामान्य होण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल असेल.

चीनला स्पष्ट संदेश -चीनला स्पष्ट संदेस देत जयशंकर म्हणाले, चीनला सैनिक मागे घ्यावेच लागतील. त्यांना पुन्हा एकदा आपल्या ठ‍िकानांवर पोहोचावेच लागेल. तेव्हाच आमचे जवानही त्यांच्या निर्धारित ठिकाणावर परततील. यानंतरच संबंध सामान्य होऊ शकतात. तसेच, सीमेवरील गस्तीसंदर्भातही दोन्ही देशांचा करार आहे. चीनला याचे पालन करावे लागेल, असेही जयशंकर यांनी म्हटले आहे.

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारतchinaचीनladakhलडाख