एस. पी. यादव नवीन आयुक्त
By admin | Published: April 13, 2015 11:53 PM
पाठक पुण्याचे आयुक्त : अनुपकुमार मुंबईला सहआयुक्त
पाठक पुण्याचे आयुक्त : अनुपकुमार मुंबईला सहआयुक्त नागपूर : अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि सीआयडीचे प्रमुख एस. पी. यादव यांची नागपुरच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. लोकमतने रविवारच्या अंकात नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून एस. पी. यादव होणार असल्याच्या आशयाचे वृत्त ठळकपणे प्रकाशित केले होते. यादव गेल्या दोन वर्षांपासून राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. येथील पोलीस आयुक्त के. के. पाठक यांचा कार्यकाळ पुर्ण झाल्यामुळे त्यांची बदली होणार, अशी महिनाभरापासूनच चर्चा होती. मुख्यमंत्र्यांच्या गुड बुकमध्ये असल्यामुळे पाठक यांना नवी मुंबई, पुणे किंवा ठाण्याचे आयुक्त म्हणून नियुक्त केले जाणार असल्याची जोरदार चर्चा होती. लोकमतने तसे वृत्तही प्रकाशित केले होते. ते अखेर खरे ठरले. मुंबई आयुक्तानंतर राज्यातील सर्वात महत्त्वाचे पद मानल्या जाणाऱ्या पुणे पोलीस आयुक्त पदावर पाठक यांना नियुक्त करण्यात आले. तर रश्मी शुक्ला, बिपीन बिहारी, कनकरत्नम, विवेक फणसाळकर तसेच डॉ. भूषणकुमार उपाध्याय ही नावे बाजूला सारत नागपूरचे आयुक्त म्हणून एस. पी. यादव यांची नियुक्ती झाली. आयुक्तांसोबतच सहआयुक्त अनुपकुमार सिंह यांची मुंबईला सहआयुक्त (आर्थिक शाखा) म्हणून बदली करण्यात आली. सर्वाधिक कार्यकाळ आणि विविध पदे सांभाळणारे अधिकारी म्हणून अनुपकुमार यांचे नाव घेतले जाते. उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त, सहपोलीस आयुक्तांसोबतच एएनओचे विशेष महानिरीक्षक म्हणून अनुपकुमार यांनी नागपुरात तब्बल सात वर्षे सेवा दिली आहे. सहआयुक्त म्हणून आता राजवर्धन जबाबदारी सांभाळणार आहेत. ते १९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. विदर्भात यापूर्वी त्यांनी नक्षलग्रस्त गोंदियात सेवा दिली आहे. अतिरिक्त आयुक्त दीपक पांडे यांचीही मुंबईलाच राज्य मानवाधिकार आयोगाचे उपमहानिरीक्षक म्हणून बदली झाली आहे. हे पद यापूर्वी महानिरीक्षक दजाचे होते. मात्र, तेथे जाण्यास ते फारसे उत्सुक नव्हते. पांडे यांच्या बदलीसोबत हे पद उपमहानिरीक्षक दर्जाचे करण्यात आले. पांडे येथे दीड वर्षांपासून कार्यरत होते. मितभाषी आणि सौजन्यशील अधिकारी असा पांडे यांचा उल्लेख केला जातो. त्यांच्या कक्षाचे दार सतत उघडेच होते. कसलीही औपचारिकता पार न पाडता त्यांना कुणीही सहज भेटू शकत होते. ---जोड आहे...पाठक म्हणतात...