शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

मरकजमध्ये कार्यक्रम न घेण्याचा साद यांनी सल्ला धुडकावला होता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2020 5:05 AM

बुद्धिवंतांनी केली होती विनंती : अनुयायांना संकटात लोटल्याचे मत

नवी दिल्ली : तबलिगी जमातचे प्रमुख मौलाना मुहम्मद साद कंधलावी यांना त्यांचे स्वत:चे सहकारी, अनेक ज्येष्ठ मुस्लिम धर्मगुरू व बुद्धिवंतांनी कोविड-१९चा उद्रेक झाल्यानंतर लगेच गेल्या मार्च महिन्यातील निजामुद्दीन कार्यक्रम रद्द करा असा सल्ला देऊन विनंती केली होती; परंतु साद यांनी ती ऐकली नाही, असे समजते.माझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवा, असे आपल्या अनुयायांना शिकवण दिलेल्या साद कंधलावी यांच्या दुराग्रहामुळे त्यांच्या शेकडो अनुयायांचे जीवित संकटात लोटले गेले आहे. एवढेच नाही तर मुस्लिमांची प्रतिमाही कलंकित झाली आहे, असे मुस्लिमांतील अनेकांचे म्हणणे आहे. निजामुद्दीनमधील कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्यांपैकी अनेक जणांची कोविड-१९ ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे व त्यांना क्वारंटाईन व्हावे लागले आहे. त्याचवेळी साद कंधलावी हे आपल्या मूठभर सल्लागारांना घेऊन लपून बसले आहेत. देशात कोरोनाचे जेवढे रुग्ण आहेत त्यातील ३० टक्के हे जमातशी संबंधित आहेत. हीच टक्केवारी उत्तर प्रदेशमध्ये जवळपास ५० टक्क्यांपर्यंत जाते. तबलिगी जमातचा दुसरा गट ‘शुरा-ए- जमात’ने कोरोना विषाणूचा उद्रेक होताच आपले सगळे कार्यक्रम रद्द केले. अविचल राहिलेले मौलाना साद यांनी पूर्वीच ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे कार्यक्रम घेण्याचा आग्रह केला ‘मशिदीतील मृत्यू उत्तम’ याबाबत प्रवचनही दिले.नाव न सांगण्याच्या अटीवर मौलाना सादचे एक निकटस्थ म्हणाले की, त्यांना अनेकदा कार्यक्रम रद्द करण्याबाबत सांगण्यात आले होते, मात्र, त्यांनी दुर्लक्ष केले. त्यांनी स्वत:च्याच अनुयायांना मृत्यूच्या खाईत ढकलले. काँग्रेसचे नेते मीम अफजल आणि मुस्लिम नेते जफर सरेशवाला यांनीही मौलाना साद यांना कार्यक्रम रद्द करण्याचा सल्ला दिला, मात्र, ते जुमानले नाहीत, असा खुलासा केला आहे. दुसरीकडे मौलाना साद यांचे सहकारी मौलाना हयारिस यांनी त्यांची बाजू घेतली. ते म्हणाले,जेव्हा जमातचे सदस्य विदेशातून येत होते, तेव्हा सरकारने त्यांना परवानगी दिली, त्यात आमची काय चूक आहे?कोरोनाच्या महामारीबद्दल ते अज्ञानी कसेतबलिगी जमातचे ज्येष्ठ मोहम्मद आलम म्हणाले की, ‘‘साद यांना प्रत्येक गोष्टीची जाणीव होती. परंतु, त्यांच्या दुराग्रही वृत्तीमुळे निष्पाप तबलिगी महामारीच्या जबड्यात लोटले गेले’’.च्जी व्यक्ती जगातील मुस्लिमांचे आपण आमीर असल्याचा दावा करते आणि मक्का आणि मदिनानंतर तबलिगी मरकज हे सर्वात पवित्र स्थळ असल्याचे सांगते ती कोरोना विषाणूच्या महामारीबद्दल एवढी कशी अज्ञानी राहू शकते, असा प्रश्न त्यांनी विचारला.च्आणखी एक वृद्ध तबलिगी सदस्य लियाकतअलीखान म्हणाले की, ‘‘जबाबदार मुस्लिम बुद्धीवंतांनी दिलेला सल्ला मौलाना साद यांनी का निरुपयोगी ठरवला? आणि आता ते का लपून बसले आहेत व विषाणूची बाधा झाली की नाही याची तपासणी का करून घेत नाहीत?’’

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या