तिरुवनंतपुरम : सबरीमाला येथील अय्यप्पा मंदिरात १० ते ५० वर्षे वयाच्या महिलांना प्रवेश देण्याबाबत अंमलबजावणी करण्याकरिता आणखी थोडा वेळ मागण्यासाठी त्रावणकोर देवस्थान मंडळाने सुप्रीम कोर्टात सोमवारी अर्ज दाखल केला.रविवारी रात्री सबरीमाला संकुलात पोलिसांनी कारवाई करून ६८ लोकांना ताब्यात घेतले होते. त्याच्या निषेधार्थ रा. स्व. संघ, भाजप, युवा मोर्चा व अन्य उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी राज्यभरात निदर्शने केली आणि सरकारी बसेसच्या काचाही फोडल्या. केरळ सरकार अय्यप्पा भक्तांबरोबरच असल्याचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी स्पष्ट केले आहे. (वृत्तसंस्था)सुविधांसाठी मिळाले १८ कोटीचकेंद्रीय मंत्री अल्फोन्स कन्ननतानम यांनी भाविकांसाठी असलेल्या सुविधांची सोमवारी पाहणी केली. भाविकांच्या सुविधांसाठी केंद्राने १०० कोटी रुपये दिले; पण राज्य सरकारने त्यातील एक रुपयाही खर्च केला नाही, अशी टीका त्यांनी केली. त्याला उत्तर देताना राज्याच्या देवस्थान खात्याचे मंत्री के. सुरेंद्रन म्हणाले की, केंद्राने २०१६ साली ९९.९८ कोटी रुपये मंजूर केले होते; पण त्यातील अवघे १८ कोटी रुपयेच राज्य सरकारला आजवर मिळाले आहेत.
सबरीमाला: देवस्थान मंडळ सुप्रीम कोर्टात, निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी मुदतवाढीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 4:51 AM