Sabarimala Temple : पोलिसांच्या गराड्यात दोन महिला मंदिराजवळ पोहोचल्या, तणाव कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 09:51 AM2018-10-19T09:51:43+5:302018-10-19T09:53:49+5:30
Sabarimala Temple : शबरीमाला डोंगरावरील प्रसिद्ध आयप्पा मंदिरामध्ये सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश द्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरही केरळमध्ये तणाव सुरू आहे.
तिरुवनंतपूरम : शबरीमाला डोंगरावरील प्रसिद्ध आयप्पा मंदिरामध्ये सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश द्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरही केरळमध्ये तणाव सुरू आहे. मंदिराच्या परिसरात भाविकांकडून निदर्शने केली जात आहे. दरम्यान, मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन महिला पत्रकार हेल्मेट घालून पोलिसांच्या गराड्यात पोहोचल्या आहेत. मात्र, पोलिसांसह महिलांना निदर्शने करणाऱ्यांनी विरोध करत माघारी जाण्यास सांगण्यात येत आहे.
#Kerala: Journalist Kavitha Jakkal of Hyderabad based Mojo TV and woman activist Rehana Fatima are en-route to the #SabarimalaTemple. pic.twitter.com/IADqXgEJZJ
— ANI (@ANI) October 19, 2018
मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या महिला भक्तांचा रस्ता न अडविण्याचे आवाहन पोलिसांनी निदर्शने करणाऱ्यांना केले आहे. आम्ही याठिकाणी कोणताही मुद्दा उपस्थित करणार नाही. तसेच, येथील भाविकांशी वाद घालणार नाही आहोत. फक्त कायद्याचे पालन करीत आहोत. तसेच, यासंबधी वरिष्ठांशी चर्चा करेन आणि थोड्याच वेळात परिस्थितीबाबत सांगेन, असे पोलीस अधिकारी एस. श्रीजीत यांनी सांगितले.
Police will not create any issue in Sabarimala and we don't want a confrontation with you devotees. We are only following the law. I will be discussing with the higher authorities and brief them on the situation: Inspector General S Sreejith to devotees. #SabarimalaTemple#Keralapic.twitter.com/regVHNZ3bE
— ANI (@ANI) October 19, 2018
दरम्यान, सबरीमाला मंदिराचे मुख्य पुजारी कंदारू राजीवारू यांनी 10 ते 50 वयोगटातील महिलांनी मंदिराच्या सन्निधानममध्ये येऊ नये, असे आवाहन केले आहे. मात्र महिलांनी मंदिरात प्रवेश केल्यास पूजा बंद करण्याचा पुजाऱ्यांचा विचार असल्याच्या वृत्ताचे त्यांनी खंडन केले आहे.
#Kerala: Journalist Kavitha Jakkal of Hyderabad based Mojo TV, being escorted by police from Pamba to Sannidhanam. #SabarimalaTemplepic.twitter.com/6lwDGStDTw
— ANI (@ANI) October 19, 2018
हिंदू संघटनांचा केरळात बंद
शबरीमाला डोंगरावरील प्रसिद्ध आयप्पा मंदिरामध्ये सर्व वयाच्या महिलांना प्रवेश खुला करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या निषेधार्थ गुरुवारी विविध हिंदू संघटनांनी केरळमध्ये बंद पाळला. त्यामुळे राज्यात बस, रिक्षा सेवा ठप्प झाली होती तर काही ठिकाणी राज्य परिवहन मंडळाच्या बसेसवर दगडफेक झाल्याचेही प्रकार घडले.