Sabarimala Temple Verdict : महिला प्रवेशाच्या ऐतिहासिक निर्णयाविरोधात भाजपाचा मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 12:45 PM2018-10-15T12:45:08+5:302018-10-15T12:58:24+5:30
Sabarimala Temple Verdict : सबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेश निर्णयाविरोधात भाजपाचा मोर्चा
तिरुअनंतपुरम - सबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशासंदर्भात सुप्रीम कोर्टानं महत्त्वपूर्ण निकाल दिला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या ऐतिहासिक निर्णयाला विरोध दर्शववणारे मोर्चे काढले जात आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा हिंदुत्ववादी संघटनांनी कडाडून विरोध केला आहे. मंदिरातील महिला प्रवेश निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी सोमवारी (15 ऑक्टोबर) भाजपानंही मोर्चा काढला.
आता सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश करता येणार आहे, असा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने 28 सप्टेंबरला दिला होता. ''महिला या पुरुषांपेक्षा दुय्यम नाहीत. महिलांना देवाची पूजा करण्यावरही बंधनं घातली जातायत. देवाशी असलेलं नातं हे शारीरिक घटकावर ठरू शकत नाहीत. सर्व भाविकांना देवाची पूजा करण्याचा समान अधिकार आहे. त्यासाठी स्त्री व पुरुषावरून भेदभाव करणं योग्य नाही. '', असंही सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केले होते.
Kerala: A protest march led by BJP is being carried out in Thiruvananthapuram against the Supreme Court verdict over the entry of women of all age group in #Sabarimala temple, ahead of the opening of its portals. pic.twitter.com/6G6SPG6C1g
— ANI (@ANI) October 15, 2018
(तो अभिनेता म्हणाला, 'सबरीमाला मंदिरात येणा-या महिलांचे दोन तुकडे करा')
सबरीमाला मंदिरात विराजमान असणारे अयप्पा ब्रह्मचारी असल्यानं या मंदिरात 10 ते 50 वर्षं वयोगटातील महिलांना प्रवेश दिला जात नव्हता, गेल्या अनेक वर्षांपासून मंदिर प्रशासनानं ही भूमिका घेतली होती. तसेच सबरीमाला मंदिराकडून महिलांबरोबर कोणताही भेदभाव केला जात नसून न्यायालयानं धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करू नये, अशी भूमिका मंदिर प्रशासनानं घेतली होती. सबरीमाला यात्रेच्या आधी 41 दिवस कठोर व्रत करण्याचा नियम आहे. मासिक पाळीमुळे महिला सलग 41 दिवस व्रत करू शकत नाहीत. त्यामुळेच 10 ते 50 या वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता.
(भाविकांची श्रद्धा पायदळी तुडवून त्यांचा देव हिरावून घेणारी न्यायालयीन झुंडशाही आहे!)
का होती मंदिरात प्रवेशबंदी?
केरळमधील सबरीमाला मंदिरात 10 ते 50 वर्ष वयोगटातील महिलांना प्रवेश दिला जात नव्हता. विशेषत: 15 वर्षांहून अधिक वयाच्या मुलींना मंदिरात प्रवेश नाकारण्यात येत होता. केवळ लहान मुली आणि वृद्ध महिलांना या मंदिरात प्रवेश दिला जायचा. मंदिरात विराजमान असलेले अयप्पा ब्रम्हचारी होते, अशी श्रद्धा आहे.