Sabarimala Temple : महिलांना मिळणार का मंदिर प्रवेश?, जाणून घ्या 10 महत्त्वपूर्ण गोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 01:14 PM2018-10-17T13:14:28+5:302018-10-17T13:21:45+5:30
Sabarimala Temple : महिलांना सबरीमाला मंदिरात प्रवेश मिळणार का?
तिरुअनंतपुरम - केरळमधील सुप्रसिद्ध सबरीमाला मंदिराचे दरवाजे आज सर्व वयोगटातील महिलांसाठी खुले होणार आहे. मंदिराचे द्वार पारंपरिक मासिक पूजेसाठी उघडण्यात येणार आहेत. सुप्रीम कोर्टाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर आज पहिल्यांदाच सर्व वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश मिळणार आहे. पण विरोध, मोर्चे, निदर्शनं पाहता महिलांना मंदिरात प्रवेश मिळणार का?, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महिलांचा प्रवेश रोखण्याचा भक्त संघटनांनी चंग बांधल्याने पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला हिंदुत्ववादी संघटनांकडून कडाडून विरोध दर्शवला जात आहे. काहींनी तर आत्महत्या करण्याचीही धमकी दिली आहे.
सबरीमाला मंदिरसंबंधीत 10 महत्त्वपूर्ण गोष्टी
1. सबरीमाला मंदिरातील महिला प्रवेशाच्या निर्णयाला वाढता विरोध पाहता सरकार आणि प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलीस व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. जवळपास 1 हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये 800 पुरुष आणि 200 महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
Kerala: Total 1000 security personnel, 800 men and 200 women, deployed at Nillekal and Pampa base. 500 security personnel deployed at Sannidhanam. Portals of the #SabarimalaTemple will be opened today. pic.twitter.com/yxjJ1CCWzq
— ANI (@ANI) October 17, 2018
2. काही संघटना आणि राजकीय पक्षांनी महिलांना मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखले आहे. पोलीस आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत आहेत.
Kerala: Over 20 people including former Travancore Devaswom Board president Prayar Gopalakrishnan taken into custody in Nilakkal and Pamba for protesting against entry of women in age group 10 to 50 to #Sabarimala temple.
— ANI (@ANI) October 17, 2018
3. मंदिराचे व्यवस्थापन करणारे त्रावणकोर देवस्थान मंडळ, मंदिरातील मुख्य पुजारी व हे मंदिर ज्यांनी बांधले त्या पूर्वीच्या पंडालम राजघराण्याचे प्रतिनिधी यांच्यातील मंगळवारची बैठक निष्फळ ठरली. महिलांच्या प्रवेशाबाबत निकालापूर्वीची स्थिती कायम ठेवावी यावर आम्ही ठाम आहोत. निर्णय देवस्थान मंडळाने घ्यायचा आहे, असे सांगून राजघराण्याचे प्रतिनिधी शशीकुमार वर्मा बैठकीला गेले. बाहेर आल्यावर त्यांनी सांगितले की, न्यायालयात फेरविचार याचिका करण्याचा आम्ही आग्रह धरला; पण त्यावर 19 ऑक्टोबर रोजी बोलू, असे देवस्थानचे म्हणणे होते. बैठकीतून काही निष्पन्न होणार नाही हे नक्की झाल्याने आम्ही उठून बाहेर आलो.
Kerala: #Visuals of heavy security deployment near Nilakkal, the base camp of #SabarimalaTemple as the portals of the temple are all set to open today. pic.twitter.com/YomkknhEVl
— ANI (@ANI) October 17, 2018
4. निलक्कलपासून १५ किमीवर असलेल्या पंबा येथून शबरीमालाचा डोंगर पायी चढण्यास सुरुवात होते. मंगळवारीच अनेक भाविक तिथे महिलांची वाहने अडवून त्यांना परत पाठवताना दिसत होते. महिला पत्रकारांनाही अडविले गेले. विशेष पोलिसांच्या डोळ्यादेखत हे सुरू होते.
It has happened for the 1st time in the world, it's amusing. 'Make me a slave,treat me unequally,we're inferior to men'; women are stopping women. What's the point in this. I don't know what's happening in this nation. It's my personal opinion, not political: Udit Raj.#Sabarimalapic.twitter.com/o5pWFtnO6V
— ANI (@ANI) October 17, 2018
5. सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश करता येणार आहे, असा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने 28 सप्टेंबरला दिला होता. देवाशी असलेलं नातं हे शारीरिक घटकावर ठरू शकत नाहीत. सर्व भाविकांना देवाची पूजा करण्याचा समान अधिकार आहे. त्यासाठी स्त्री व पुरुषावरून भेदभाव करणं योग्य नाही. '', असंही सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केले होते.
#UPDATE: 50 people have been taken into custody in Pathanamthitta district for protesting against entry of women in age group 10 to 50 to #Sabarimala temple. https://t.co/JDhoR3APET
— ANI (@ANI) October 17, 2018
6. पूजा करण्याचा अधिकार सर्व भाविकांना आहे, असंही कोर्टानं स्पष्ट केलं होतं.
Kerala: Protests being held near Pamba base camp against entry of women in the age group 10-50 to #SabarimalaTemplepic.twitter.com/JTZ2negQ5L
— ANI (@ANI) October 17, 2018
7. फेरविचार याचिका दाखल केली जाणार नाही व कोणालाही मंदिर प्रवेशास प्रतिबंध करणार नाही. सर्व भाविकांना मंदिरात जाऊन दर्शन घेण्यासाठी सोयीसुविधा दिल्या जातील, असे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी स्पष्ट केले.
Pamba: Police detain people protesting against the entry of women in the age group of 10-50 women to Kerala's #SabarimalaTemplepic.twitter.com/DLdoYMVz8J
— ANI (@ANI) October 17, 2018
8. सुप्रीम कोर्टाच्या निकालाविरुद्ध केरळमध्ये अनेक मोर्चे निघत आहेत. सरकार निकालाचे पालन करणार असे म्हणत असले तरी भाजपा व काँग्रेस यांनी भक्तांच्या व प्रवेशबंदीच्या बाजूने उभे आहेत.
Nilakkal: A woman Madhavi on her way to #SabarimalaTemple returned mid-way along with her relatives after facing protests. #Keralapic.twitter.com/OUCbOqa1aO
— ANI (@ANI) October 17, 2018
Supreme Court has made a decision, but now you are saying that it's our tradition. Triple Talaq is also a tradition in that way, everybody was applauding when it was abolished. The same Hindus have come on the streets now: Subramanian Swamy. #SabarimalaTemplepic.twitter.com/8GZvM4kDTN
— ANI (@ANI) October 17, 2018
9. केरळमधील सबरीमाला मंदिरात 10 ते 50 वर्ष वयोगटातील महिलांना प्रवेश दिला जात नव्हता. विशेषत: 15 वर्षांहून अधिक वयाच्या मुलींना मंदिरात प्रवेश नाकारण्यात येत होता. केवळ लहान मुली आणि वृद्ध महिलांना या मंदिरात प्रवेश दिला जायचा. मंदिरात विराजमान असलेले अयप्पा ब्रम्हचारी होते, अशी श्रद्धा आहे.
Kerela: Congress party leaders hold a peaceful protest in Nilakkal against the entry of women in the age group of 10-50 to #SabarimalaTemplepic.twitter.com/EtHSp6NNrv
— ANI (@ANI) October 17, 2018
10. धक्कादायक बाब म्हणजे सबरीमाला मंदिरातील महिला प्रवेशासंदर्भात सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयाला विरोध करणाऱ्या आंदोलकांमध्ये महिलांची संख्या अधिक आहे.
#WATCH: Women protest in Nilakkal against the entry of women in the age group of 10-50 to #Sabarimala temple. #Keralapic.twitter.com/GuxDZo0R7G
— ANI (@ANI) October 17, 2018
It has happened for the 1st time in the world, it's amusing. 'Make me a slave,treat me unequally,we're inferior to men'; women are stopping women. What's the point in this. I don't know what's happening in this nation. It's my personal opinion, not political: Udit Raj.#Sabarimalapic.twitter.com/o5pWFtnO6V
— ANI (@ANI) October 17, 2018