कानपूर : वाराणसीहून अहमदाबादकडे जाणाऱ्या साबरमती एक्स्प्रेसचे २० डबे शु्क्रवारी रात्री उशिरा कानपूरच्या गाेविंदपुरी स्टेशजवळ रुळावरून घसरले. यात सुदैवाने काेणतीही जीवित हानी झाली नाही. दरम्यान, रूळावर ठेवण्यात आलेल्या एका माेठ्या टणक वस्तूला इंजिन धडकल्याने हा अपघात झाल्याचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे.
रात्री सुमारे अडीचच्या सुमारास हा अपघात झाला. रेल्वेच्या साेळाव्या डब्याजवळ एक संशयित वस्तू आढळून आली आहे. इंजिनच्या कॅटल गार्डचे झालेले नुकसान पाहता याच वस्तूला इंजिन धडकून इंजिन रूळावरून घसरल्याची शक्यता आहे.
आयबी आणि यूपी पाेलिसांनी सुरू केला तपासदगडसदृष्य माेठी वस्तू इंजिनला धडकली आणि समाेरील कॅटल गार्ड दुमडला गेला. इंजिन ज्या वस्तूला धडकले त्यासह इतर पुरावे एकत्रित केले आहेत. आयबी आणि उत्तर प्रदेश पाेलिस याबाबत कसून तपास करीत आहेत.