नवी दिल्ली : सचिन तेंडुलकर आणि रेखा, यांची ओळख भारतीयांना तरी करून देण्याची गरज नाही. आपापल्या क्षेत्रामध्ये या दोघांनीही आपला अमीट ठसा उमटवला आहे. त्यामुळेच त्यांना राज्य सभेत मानद प्रवेशही देण्यात आला. पण गेल्या सहा वर्षांमध्ये त्यांनी उपस्थिती नगण्यच अशी होती. पण आपली खासदारकी वाचवण्यासाठी मात्र त्यांनी प्रत्येक सत्रामध्ये नाममात्र उपस्थिती मात्र लावली होती. आता अखेरच्या सत्रामध्येही सचिन आणि रेखा हे एखाद दोन दिवस आपले दर्शन संसदेला देण्याचा तयारीत असतील. पण या कालावधीत सचिन आणि रेखा यांची काही व्यावसायिक कामे असतील तर त्यांचे दर्शन दुर्लभही होऊ शकते.आतापर्यंतच्या सहा वर्षांमध्ये या दोघांनी किती दिवस संसदेत उपस्थिती लावली आणि किती प्रश्न विचारले, हे सांगणे न बरे. कारण या दोघांचाही संसदेच्या कामकाजातील सहभाग अत्यल्प असाच राहीलेला आहे.रेखा यांनी सहा वर्षांच्या कार्यकाळात एकही प्रश्न उपस्थित केलेला नाही. प्रश्न उपस्थित केला नाही म्हणजे त्यांचा केंद्र सरकारशी संवाद झालेला नाही. कारण जेव्हा कोणी खासदार प्रश्न विचारतात तेव्हा त्याचे उत्तर सरकारकडून दिले जाते आणि हे सारे राज्यसभेच्या संकेतस्थळावर पाहायला मिळते. बॉलीवूडमध्ये रेखा या चर्चेचा विषय असल्या तरी संसदेमध्ये त्यांच्या नावाची चर्चाच झाली नाही. 2017 साली संसदेमध्ये 373 दिवस कामकाज चालले, यामध्ये फक्त 18 दिवस रेखा उपस्थित राहील्या होत्या. म्हणजेच त्यांची उपस्थिती ही फक्त 5 टक्के एवढीच होती.रेखा यांनी संसदेत सहा वर्षांमध्ये एकही प्रश्न विचारला नाही, पण सचिनने आतापर्यंत 22 प्रश्न विचारले आहेत. सचिनला या प्रश्नांची उत्तरेही सरकारने दिली आहेत. पण या सहा वर्षांत संसदेमध्ये सचिनच्या नावाचीही जास्त चर्चा झाली नसल्याचेच समोर आले आहे.
सचिन आणि रेखा यांचे दर्शन संसदेला होणार ; खासदारकी वाचवण्यासाठीचे प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2018 17:03 IST
गेल्या सहा वर्षांमध्ये सचिन आणि रेखा यांची उपस्थिती नगण्यच अशी होती. पण आपली खासदारकी वाचवण्यासाठी मात्र त्यांनी प्रत्येक सत्रामध्ये नाममात्र उपस्थिती मात्र लावली होती.
सचिन आणि रेखा यांचे दर्शन संसदेला होणार ; खासदारकी वाचवण्यासाठीचे प्रयत्न
ठळक मुद्देरेखा यांनी सहा वर्षांच्या कार्यकाळात एकही प्रश्न उपस्थित केलेला नाही.