जयपूर - राजस्थानमध्ये राजकीय नाट्यामध्ये रोज नवनवे आरोप प्रत्यारोप होत असतानाच आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सचिन पायलट यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली आहे. सचिन पायटल यांना कमी वयातच खूप काही मिळाले होते. मात्र मात्र त्यांनी पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले. ते अकार्यक्षम आहेत, हे मला आधीपासून माहिती होते, अशी बोचरी टीका गलहोत यांनी केली.
राजस्थानमधील सत्तासंघर्षात पायलट यांच्यावर आघाडी घेतल्यानंतर आता अशोक गहलोत हे त्यांच्याविरोधात आक्रमक होऊ लागले आहेत. गहलोत म्हणाले की, आम्ही सचिन पायलट यांच्याबाबत कधीही प्रश्न उपस्थित केले नाहीत. राजस्थान हे असे राज्य असावे जिथे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना बदलण्याची मागणी झाली नाही. ते बिनकामाचे आहेत, अकार्यक्षम आहेत, हे आम्हाला माहिती होते. मात्र आम्ही त्यांच्याविरोधात कधी काही बोललो नाही. आम्ही सर्वांनी त्यांना सन्मान दिला.
गहलोत पुढे म्हणाले की, आता हा जो काही खेळ झाला आहे तो १० मार्चलाच होणार होता. मात्र तेव्हा आम्ही हा प्रकार सर्वांसमोर आणला. सचिन पायलट यांची काँग्रेसचा अध्यक्ष बनण्याची महत्त्वाकांक्षा होती. मोठमोठे कॉ़र्पोरेट त्यांना फंडिंग करत आहेत. तसेच भाजपाकडूनही फंडिंग केली जात आहे. मात्र आम्ही या सर्व् कारस्थानाची पोलखोल केली.
आज देशात गुंडगिरी सुरू आहे. मनमानी पद्धतीने छापे टाकले जात आहेत. माझ्या निकटवर्तींयांच्या घरांवर छापे पडणार याची कुणकूण मला दोन दिवस आधीच लागली होती. सध्या सचिन पायलट यांच्यावतीने कोर्टात महागडे वकील लढत आहेत. त्यांचे पैसे कुठून येत आहेत. सचिन पायलट हे पैसे देत आहेत का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. एकीकडे सचिन पायलट यांना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच गहलोत हे मात्र त्यांच्यावर थेट टीका करत आहेत. गहलोत यांनी यापूर्वीही पायलट यांच्यावर टीका केली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी
coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल
भारतानंतर आता या देशाने चीनला दाखवली सैनिकी तादक, घुसखोरीला चोख प्रत्युत्तर देण्याचा दिला इशारा
महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही
…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान
coronavirus: कोरोनाबाधित रुग्णाचे तब्बल दीड कोटींचे बिल केले माफ, तिकीट देऊन केली मायदेशी पाठवणी