शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
6
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
7
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
8
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
9
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
13
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
14
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
15
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
16
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
17
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
18
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
19
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

अशोक गेहलोत यांच्यावरच सचिन पायलट नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 1:27 AM

पायलट हे सोमवारच्या विधीमंडळ बैठकीपासून दूर राहिले होते. काँग्रेसचे १८ आमदारही या बैठकीपासून दूर राहिले. तत्पूर्वी, आपल्या पाठीशी काँग्रेसचे ३० आमदार व काही अपक्ष आमदार आहेत, असा दावा पायलट यांनी केला होता.

जयपूर/नवी दिल्ली : २०१८ मधील विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्रीपद दिल्यापासून सचिन पायलट नाराज होते. पण मध्यप्रदेशात ज्योदिरादित्य सिंदिया यांच्या बंडानंतर पायलट यांनी समर्थक आमदारांसह भाजपशी संपर्क सुरू केला. ते पुरेसे आमदार घेऊन आल्यास भाजप नेते त्यांना मुख्यमंत्री करण्यास तयार होते, अशी चर्चा सुरूच होती. विधानसभेतील विजय पायलट यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कार्यकाळात मिळाल्याने त्यांचा या पदावर दावा आहे, असे समर्थकांचे म्हणणे होते.पायलट हे सोमवारच्या विधीमंडळ बैठकीपासून दूर राहिले होते. काँग्रेसचे १८ आमदारही या बैठकीपासून दूर राहिले. तत्पूर्वी, आपल्या पाठीशी काँग्रेसचे ३० आमदार व काही अपक्ष आमदार आहेत, असा दावा पायलट यांनी केला होता. मात्र, २०० सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसच्या १०७ पैकी बहुतांश व काही अपक्षांनी गेहलोत सरकारवर विश्वास व्यक्त केला. त्यानंतर पायलट यांनी गेहलोत यांना बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान दिले.मंगळवारी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक संपल्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पायलट व दोन जणांना मंत्रीपदावरून बरखास्त केल्याची घोषणा केली.पक्षाचे ओबीसी नेते गोविंदसिंग डोटासरा हे राजस्थानचे नवे प्रदेशाध्यक्ष असतील. त्याचबरोबर आदिवासी नेते व आ. गणेश घोगरा यांची युवा काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.गेहलोत यांनी घेतली राज्यपालांची भेटविधिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री गेहलोत यांनी राज्यपाल कलराज मिश्रा यांची भेट घेतली व तीन जणांना मंत्रिमंडळातून काढण्याची शिफारस केली. दरम्यान, राज्यातील राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले होते.बहुमत सिद्ध करा, भाजपची मागणीभाजपने गेहलोत सरकारच्या बहुमताच्या चाचणीची मागणी केली आहे. आमदारांच्या घरांवर पाळत ठेवली जात आहे व बीटीपीच्या आमदारांना धमकावले जात आहे, असा आरोपही पक्षाने केला आहे. विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी म्हटले आहे की, सरकारने आधी बहुमत सिद्ध करावे व नंतर मंत्रिमंडळाचा फेरबदल करावा.हकालपट्टी दुर्दैवी, काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रियासचिन पायलट यांची दोन्ही पदांवरून हकालपट्टी करण्याचा निर्णय दुर्दैर्वी व दु:खदायक आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेत्यांनी दिली. पक्षाचे प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी म्हटले आहे की, खुल्या दरवाजांचा वापर केला जात नसेल तर काही दरवाजे बंद केलेच पाहिजेत. आम्हाला अजूनही आशा आहे.

टॅग्स :Sachin Pilotसचिन पायलटAshok Gahlotअशोक गहलोत