नवी दिल्ली -राजस्थानातील सत्ता संघर्षाने काँग्रेसला घाम फोडला आहे. तेथे आपले सरकार आणि बंडखोर दोघांनाही वाचवण्यासाठी काँग्रेस पूर्ण जोर लावत आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर नाराज असलेल्या सचिन पायलटांची मनधरणी अद्यापही सुरूच आहे. आता सचिन पायलट यांनी काँग्रेस हाय कमांडसमोर तीन मागण्या ठेवल्याचे वृत्त आहे.
काँग्रेस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन पायलट यांच्याकडू आपल्याला मुख्यमंत्री बनवण्यात यावे, अविनाश पांडे यांना राजस्थानच्या प्रभारी पदावरून तत्काळ बाजूला करावे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मंत्रिमंडळात महत्वाची पदे मिळावीत, अशा तीन मागण्या ठेवल्या आहेत. यांपैकी दोन मागण्या काँग्रेसला मंजूर असल्याचे समजते. मात्र, मुख्यमंत्री पदावर अद्यापही मंथन सुरूच आहे.
यातच आता, जे आमदार मंगळवारी बोलावण्यात आलेल्या बैठकीला हजर झाले नाही, त्यांना काँग्रेस नोटिस पाठवणार आहे.
काँग्रेसकडून सात्याने सांगण्यात येत आहे, की हाय कमांडने अनेक वेळा राजेश पायलट यांच्याशी चर्चा केली. काँग्रेसने राजेश पायलट यांना जयपूर येथील बैठकीला उपस्थित राहण्यस सांगितले होते. मात्र पायलट आणि त्यांच्या समर्थकांनी याला प्रतिसाद दिला नाही.
महत्त्वाच्या बातम्या -
CoronaVirus : आता बायोकॉन आणणार कोरोना रुग्णांसाठी औषध, किंमत बघून व्हाल हैराण
...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप
धक्कादायक! : हनीट्रॅप अन् 9 कोटी 'हेर'; धूर्त चीन अशी करतो जगाची 'हेरगिरी'
खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा