Sachin Pilot: 'मला तात्काळ मुख्यमंत्री करा अन्यथा...', सचिन पायलट यांची काँग्रेसकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 04:27 PM2022-04-28T16:27:54+5:302022-04-28T16:28:15+5:30

Sachin Pilot: सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी सोनिया गांधींकडे राजस्थानचा मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Sachin Pilot: 'Make me Chief Minister immediately, otherwise', Sachin Pilot's demand to Congress | Sachin Pilot: 'मला तात्काळ मुख्यमंत्री करा अन्यथा...', सचिन पायलट यांची काँग्रेसकडे मागणी

Sachin Pilot: 'मला तात्काळ मुख्यमंत्री करा अन्यथा...', सचिन पायलट यांची काँग्रेसकडे मागणी

Next

जयपूर: अनेक काँग्रेसशासित राज्यात अंतर्गत कलह पाहायला मिळत आहे. यातच आता राजस्थानमध्येही मुख्यमंत्रिपदासाठी दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेस नेते सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी सोनिया गांधींकडे (Sonia Gandhi) मुख्यमंत्री बनवण्याची मागणी केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'आगामी निवडणुकीत पक्षाचा विजय सुनिश्चित करण्यासाठी तात्काळ मला मुख्यमंत्री करा', अशी मागणी सचिन पायलट यांनी केली आहे. 

पंजाबप्रमाणे राजस्थानची स्थिती?
सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही आठवड्यात सचिन पायलटने राहुल, प्रियंका आमि सोनिया यांच्या भेटी घेतल्या आहेत. राजस्थानमध्ये डिसेंबर 2023 मध्ये निवडणुका होणार आहेत. मला मुख्यमंत्री न केल्यास पंजाबमधील परिस्थितीची पुनरावृत्ती राजस्थानमध्ये होईल, असे पायलटने हायकमांडला सांगितले आहे. पंजाबमध्ये चरणजित सिंग चन्नी यांना अखेरच्या काही महिन्यांसाठी मुख्यमंत्री करण्याचा फॉर्म्युला फेल ठरला होता.

अनेक नेत्यांचा भाजप प्रवेश
यापूर्वी सचिन पायलट हे राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री होते. पण 2020 मध्ये त्यांनी पक्षाविरोधात बंड केल्याने त्यांना दोन्ही पदे गमवावी लागली. गेल्या दोन वर्षांत काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांनी पक्ष सोडला, त्यामुळे त्यांच्या मागणीकडे काँग्रेस गांभीर्याने पाहू शकते. राहुल गांधींच्या निकटवर्तीयांचा विचार केला तर आता फक्त सचिन पायलट उरले आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया, जितिन प्रसाद आणि आरपीएन सिंह यांसारखे मोठे नेते भाजपमध्ये दाखल झाले आहेत.

यापूर्वीही केला होता बंड
सचिन पायलटने यापूर्वीही राजस्थानचे मुख्यमंत्री व्हायची इच्छा व्यक्त केली होती. 2018 च्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला होता. तेव्हा सचिन पायलट मुख्यमंत्री होतील, अशी अपेक्षा होती. पण, त्यांच्या जागी दिग्गज अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्री करण्यात आले. दोन वर्षांनंतर, पायलट यांनी 18 आमदारांसह बंड केले, पण पक्षाने त्यांचे मन वळवण्यात यशस्वी झाला. 

Web Title: Sachin Pilot: 'Make me Chief Minister immediately, otherwise', Sachin Pilot's demand to Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.