नवी दिल्ली : राजस्थानच्या राजकारणात सध्या मुख्यमंत्रिपदावरुन चांगलीच चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत काँग्रसच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत, त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागणार असल्याचे बोलले जात आहे. राजस्थानचे मुख्यमंत्रिपद सचिन पायलट यांना देण्यात असल्याचे चर्चा सुरू आहेत. आता या संदर्भात नवी माहिती समोर आली आहे. या संदर्भात आज जयपूरमध्ये बैठक होणार आहे.
आज या बैठकीत अशोक गहलोत यांना मुख्यमंत्रीपद सोडण्यासंदर्भात प्रस्ताव देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी राजस्थानला नवा मुख्यमंत्री मिळणार आहे. सध्या पुढचे मुख्यमंत्री सचिन पायलट होणार असल्याची चर्चा सुरू आहे. पण पायलट यांच्या नावावर अजुनही एकमत झाले नसल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या असल्याचे बोलले जात आहे. गहलोत अजुनही पायलट यांच्यावर नाराज आहेत, त्यामुळे ते पायलट यांना उत्तराधिकार बनवण्यास तयार नाहीत, असं बोलले जात आहे.
राजस्थानमध्ये सध्या एका नवीन फॉर्म्युलावरही विचार केला जात आहे, ज्याअंतर्गत सभापती सीपी जोशी यांना मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष गोविंद दोतासरा यांना उपमुख्यमंत्रीपद दिले जाऊ शकते.तर सचिन पायलट यांना पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्षपद दिले जाऊ शकते.
अशोक गहलोत हे सीपी जोशींच्या बाजूने आहेत.२००८ च्या विधानसभा निवडणुकीत हमाझ एका मताने हरले आणि मुख्यमंत्री बनले. सीपी जोशी केंद्रात ४ वेळा मंत्री राहिले आहेत. जोशी हेही राहुल गांधी यांच्या जवळचे असल्याचे बोलले जाते. २०१८ मध्ये अडचणीत आलेले अशोक गहलोत यांचे सरकार वाचवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, असल्याचे बोलले जात आहे.
सचिन पायलट होणार राजस्थानचे मुख्यमंत्री? आज आमदारांच्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब
या फॉर्म्युल्याअंतर्गत सचिन पायलट यांना पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्ष बनवण्याची चर्चा आहे. गेल्या निवडणुकीतही पायलट यांनी प्रदेश काँग्रेसची कमान हाती घेतली होती आणि पक्षाला बहुमत मिळवण्यात यश आले होते.