शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

सचिनने सावरला कोसळणा-या शाळेचा डोलारा

By admin | Published: June 14, 2016 3:13 PM

समाजसेवेमध्ये अग्रेसर असणा-या सचिन तेंडुलकरने आता पश्चिमबंगालमधील एका दुर्लक्षित शाळेच्या पुनर्बांधणीसाठी आपला खासदार निधी दिला आहे.

 ऑनलाइन लोकमत 

कोलकाता, दि. १४- क्रिकेटच्या मैदानावरुन निवृत्ती घेतल्यानंतर खासदार म्हणून काम करताना समाजसेवेमध्ये अग्रेसर असणा-या सचिन तेंडुलकरने आता पश्चिमबंगालमधील एका दुर्लक्षित शाळेच्या पुनर्बांधणीसाठी आपला खासदार निधी दिला आहे. यापूर्वी आदर्श ग्राम योजनेतंर्गत आंध्रप्रदेशमधील पुत्तमराजू कंद्रिगा गाव सचिनने दत्तक घेतले आहे. 
 
सचिनचा आदर्श स्ट्रोक, दत्तक घेतलेल्या गावाचा चार महिन्यात मेकओव्हर
 
मुख्याध्यापकांच्या विनंतीवरुन सचिनने गोबिंदपूर माकरमपूर स्वर्णमोयी सासमल शिक्षा निकेतन शाळेच्या दुरुस्तीसाठी ७६,२१,०५० इतकी रक्कम खासदार निधीतून दिली आहे. पश्चिम बंगालच्या मिदानपोर जिल्ह्यात ही शाळा आहे. सचिनने ७५ टक्के निधी दिला असून, तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम दिली आहे.
 
मरीन ड्राईव्हवरील तेंडुलकरचं मेटल आर्ट पीस हटवण्याचे पालिकेचे आदेश
 
सचिनकडून मदत मिळणे हे चमत्कारपेक्षा कमी नाही असे मुख्याध्यापक उत्तम कुमार मोहांती सांगतात.  ही शाळा कोसळण्याच्या अवस्थेत होती. स्थानिक आमदार, खासदारांचे त्यांनी मदतीसाठी अनेकदा उंबरे झिजवले पण काही उपयोग झाला नाही. दहावर्षाच्या संघर्षानंतर एकदिवस त्यांना सचिनला मदतीसाठी पत्र लिहीण्याची कल्पना सुचली. 
 
सचिनच्या खासदारकीला त्यावेळी एकवर्ष झाले होते आणि संसदेतील अनुपस्थितीमुळे त्यांच्यावर टीका सुरु होती. मोहांती यांनी सचिनचा ई-मेल अॅड्रेस मिळवला व १३ मार्च २०१३ रोजी सचिनला आर्थिक मदतीसाठी पत्र पाठवले. यानंतर वर्षभराचा कालावधी लोटला. सचिनला पत्र लिहील्याचे मोहांती विसरुन गेले होते. 
 
त्यानंतर सात ऑगस्ट २०१४ रोजी सचिनकडून पत्राला उत्तर मिळाले. सचिनने शाळेच्या पूर्नबांधणीसाठी पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले होते. दिलेल्या शब्दाला जागत सचिनने या शाळेला उभे करण्यासाठी पूर्ण मदत केली.