शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live: रतन टाटांचे पार्थिव वरळीच्या स्मशानभूमीत दाखल, थोड्या वेळात अंत्यसंस्कार
2
दिल्लीतील आमदारांची' आतिशी 'बाजी; 'आमदार निधी' १५ कोटी मिळणार, मुख्यमंत्र्यांची माहिती
3
"या नेत्यांमुळे काँग्रेस हरयाणात हरली’’, पराभवाचं खापर फोडत संतप्त राहुल गांधींनी मांडलं परखड मत 
4
उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली?; रविकांत तुपकरांनी सांगितली रणनीती
5
Harry Brook भारी खेळला; पण Virender Sehwag च्या वर्ल्ड रेकॉर्डला धक्का नाही लागला
6
'फुलवंती' मध्ये हास्यजत्रेची फौज, कलाकारांनी किती मानधन घेतलं? प्राजक्ता माळी म्हणाली...
7
कमाल! २ वेळा अपयश आलं, निराश झाली पण हरली नाही...; IPS अधिकारी होण्याचं स्वप्न केलं पूर्ण
8
मदरश्यांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ, खासगी विद्यापीठांना मंजुरी, राज्य मंत्रिमंडळात निर्णयांचा धडाका
9
Video: चेंडू हवेत जाताच हार्दिक पांड्या तुफान धावत सुटला, एका हाताने टिपला भन्नाट कॅच
10
सणासुदीच्या काळात मोदी सरकारची राज्यांना मोठी भेट, 1.78 लाख कोटी रुपये जारी...
11
"रतन टाटांसारख्या व्यक्तीला खरं तर हयात असतानाच 'भारतरत्न'ने सन्मानित करायला हवं होतं"
12
"या पराभवाला खूप गंभीरपणे..."; हरयाणा विधानसभा निकालावर अशोक गेहलोत यांचं मोठं विधान
13
२० वर्षांपासून असलेल्या नोकराने घात केला; भाजपा मंत्र्याच्या ५० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला
14
आळंदीची लेक ते महाराष्ट्राची लोकप्रिय गायिका; जीवनातील अध्यात्माचं महत्त्व, महिला सुरक्षेवरही कार्तिकी स्पष्टच बोलली..
15
PAK vs ENG : मुल्तानमध्ये इंग्लंड 'सुल्तान'! ऐतिहासिक आकडा अन् विश्वविक्रम; भारताचा विक्रम मोडला
16
रिस्क घ्यायची नसेल तर 'या' सरकारी स्कीममध्ये गुंतवा पैसा; रिटायरमेंटपर्यंत व्हाल २,२६,९७,८५७ रुपयांचे मालक
17
इंग्लंड-पाक नव्हे भारत-श्रीलंका लढतीत सेट झालाय कसोटीतील सर्वोच्च धावसंख्येचा वर्ल्ड रेकॉर्ड
18
रतन टाटांसह त्यांच्या भावानेही लग्न केले नाही; सावत्र भाऊ सांभाळतो व्यवसाय, कुटुंबात कोण..?
19
Dussehra 2024: दसर्‍याला आठवणीने करा 'हे' एक काम; वास्तुमध्ये सदैव राहील सुख, संपत्ती, समाधान!
20
PAK vs ENG Live : इंग्लंड ७ बाद ८२३! पाकिस्तानी चाहत्यांना वेदना देणारी 'कसोटी', हॅरी ब्रूकच्या ३१७ धावा

चोरट्यांचा ३६ हजार कोटींवर डल्ला

By admin | Published: January 06, 2015 1:55 AM

राजधानी दिल्ली गुन्ह्यांची राजधानी बनली आहे. वर्षभरात येथील चोरटे अर्थसंकल्पाच्या बरोबरीच्या रकमेवर डल्ला मारतात.

दिल्लीतील प्रकार : चोरीची रक्कम अर्थसंकल्पाच्या बरोबरीचीनितीन अग्रवाल - नवी दिल्लीराजधानी दिल्ली गुन्ह्यांची राजधानी बनली आहे. वर्षभरात येथील चोरटे अर्थसंकल्पाच्या बरोबरीच्या रकमेवर डल्ला मारतात. एकेकाळी स्कॉटलँड यार्ड पोलिसांशी तुलना होणारे दिल्लीचे पोलीस चोऱ्यांचा छडा लावण्यात पुरते मागे आहेत.२०१४ मध्ये दिल्लीतील चोरट्यांनी किमान ३६ हजार कोटींच्या मालमत्तेवर हात मारला. दिल्लीचे वार्षिक अंदाजपत्रकही ३६,७६६ कोटींचे होते हे उल्लेखनीय. या शहरात चोरांनी २०१३ मध्ये ३४,५९४ कोटी, २०१२ मध्ये २१,२११, २०११ मध्ये २०,५६६ कोटींच्या मालमत्तेवर हात मारला. पोलीस ठाण्यांमध्ये नोंद झालेल्या घटनांमधील रोख आणि अन्य स्वरूपातील मालमत्तेसंबंधी ही आकडेवारी आहे. छोट्या चोऱ्यांबद्दल लोक पोलीस ठाण्यांकडे तक्रार करण्याची तसदीही घेत नाहीत.खिसेकापू महिला चोर...दिल्लीत बालगुन्हेगारी आणि महिलांचा वाढता सहभाग पोलिसांसाठी डोकेदुखीचे कारण ठरला आहे. गेल्यावर्षी दरोड्याच्या ८९, भुरट्या चोऱ्यांमध्ये २६२, तर वाहन चोरीच्या प्रकरणांमध्ये १११ बाल गुन्हेगारांचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मेट्रोच्या १३४ रेल्वेस्थानकांवर खिसेकापू चोरांमध्ये महिलांचा सहभाग जास्त असतो. जानेवारी ते नोव्हेंबर २०१४ या ११ महिन्यांच्या काळात २९३ खिसेकापू महिला चोरांना पकडण्यात आले. पुरुष खिसेकापूंची संख्या केवळ २२ असल्याचे आढळून आले आहे. २०१४ मधील चोरीचा ऐवजदागिने- ५५३५ कोटी रुपयेरोख- ६,५७२.८६ कोटी रुपयेफोन, लॅपटॉप- १,७२९.७० कोटी रुपयेवाहने- १६,०८६.३० कोटी रुपयेअन्य चोऱ्या- ४,८७०.१९ कोटी रुपयेहायटेक चोऱ्या...: दिल्लीतील चोर हायटेक बनले आहेत. चोरीच्या मालावर जास्तीत जास्त नफा कमावतानाही ते तंत्रज्ञानाचा वापर करतात. मोबाईल, लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या चोऱ्या वाढल्या आहेत. आॅनलाईन फ्री क्लासिफाईड साईटच्या माध्यमातून वस्तू विकताना फसवेगिरीचा फंडा अवलंबला जातो.