शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

सिद्धरामेश्वरांच्या जयजयकारात आल्या पालख्या 32 गावच्या पालख्या : दुष्काळ हटवण्यासाठी पालकमंत्र्यांचे देवाला साकडे

By admin | Published: August 31, 2015 9:43 PM

सोलापूर : ‘सिद्धेश्वर महाराज की जय़़़ एकदा भक्तलिंग हर बोला़़़ हर्र’ अशा घोषणा देत 32 गावांतून ग्रामदैवताच्या मंदिरात पालख्या दाखल झाल्या़ धार्मिक विधी, पूजेनंतर या पालख्या पुन्हा गावाकडे मार्गस्थ झाल्या़ तसेच तिसर्‍या र्शावण सोमवारनिमित्त लाखो भक्तांनी ग्रामदैवताचे आणि योगसमाधीचे दर्शन घेतल़े

सोलापूर : ‘सिद्धेश्वर महाराज की जय़़़ एकदा भक्तलिंग हर बोला़़़ हर्र’ अशा घोषणा देत 32 गावांतून ग्रामदैवताच्या मंदिरात पालख्या दाखल झाल्या़ धार्मिक विधी, पूजेनंतर या पालख्या पुन्हा गावाकडे मार्गस्थ झाल्या़ तसेच तिसर्‍या र्शावण सोमवारनिमित्त लाखो भक्तांनी ग्रामदैवताचे आणि योगसमाधीचे दर्शन घेतल़े
अप्पावरूंच्या संकल्पनेनुसार गेल्या 9 वर्षांपासून वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांच्या ग्रामदैवतांच्या पालख्या सिद्धरामेश्वरांच्या दर्शनासाठी र्शावण मासातील तिसर्‍या सोमवारी येतात़ यावर्षी वैभवपूर्ण पद्धतीने 32 गावच्या पालख्या दाखल झाल्या़ रविवारी रात्री अक्कलक ोट रोडवरील वीरतपस्वी मठात या पालख्या दाखल झाल्या़ रात्री भजन आणि धार्मिक विधीचा सोहळा पार पडला़ सोमवारी पहाटे 6 वाजता पंचमुखी परमेश्वर लिंगाची पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू आणि आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते पूजा करण्यात आली़ त्यानंतर सकाळी 6़30 वाजता या पालख्या वाजतगाजत सिद्धरामेश्वर मंदिराकडे मार्गस्थ झाल्या़
अक्कलकोट पाणी टाकी, जोडबसवण्णा चौक, औद्योगिक बँकमार्गे पालख्या सोन्नलगी मंदिरात आल्या़ यावेळी महापौर सुशीला आबुटे यांच्या हस्ते पालख्यांची पूजा करण्यात आली़ काही वेळातच पालख्या पुढे मार्गस्थ झाल्या़ कोंतम चौक, कुंभार वेस, शिवानुभव मंगल कार्यालय, चाटी गल्ली, बाळीवेस, विजापूर वेस, पंचक?ामार्गे दुपारी 1 वाजता पालख्या सिद्धरामेश्वरांच्या मंदिरात दाखल झाल्या़ दिवसभर महाप्रसाद वाटप आणि धार्मिक कार्यक्रम पार पडल़े त्यानंतर सायंकाळी 4 वाजता या सर्व पालख्या गावाकडे मार्गस्थ झाल्या़
सिद्धरामेश्वरांना साकडे
पालख्या सिद्धेश्वर मंदिरात येताच पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते शिवयोग समाधीची पूजा करण्यात आली़ यावेळी मंदिर समितीचे व्यवस्थापक गुंडप्पा कारभारी, ट्रस्टी धर्मराज काडादी, मनपा आयुक्त विजयकुमार काळम-पाटील, सोमशंकर देशमुख, मल्लिकार्जुन वाकळे, गुंडप्पा कारभारी, काशिनाथ दर्गोपाटील, आनंद हब्बू, विश्वनाथ हब्बू, महेश हब्बू, केदारनाथ हब्बू, आनंद हब्बू, प्रशांत हब्बू, सिद्धलिंग हब्बू यांची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते पूजा करण्यात आली़ त्यांनी सोलापूरवरील दुष्काळाचे सावट हटवण्याचे साकडे ग्रामदैवताला घातल़े रात्री 9़30 वाजता मंदिरात महाआरती झाली़ (प्रतिनिधी)
मेघडंबरीच्या सजावटीने वेधले लक्ष
तिसर्‍या सोमवारी शिवयोग समाधीपुढे अक्की (तांदूळ) पूजा करण्यात आली़ मेघडंबरीची फुलांनी सजावट आणि अक्की पूजा ही शिवानंद कोनापुरे यांच्या वतीने करण्यात आली होती़ विविध फुलांनी सजलेली मेघडंबरी सार्‍या भक्तांसाठी लक्षवेधी ठरली़ दिवसभरात लाखो भाविकांनी सिद्धरामेश्वरांचे दर्शन घेतल़े
32 गावच्या पालख्या
होटगी, होटगी मठ एमआयडीसी, शिंगडगाव, कुंभारी, कोन्हाळी, दोड्याळ, वडगाव, रामपूर, तोगराळी, भोसगा, हालहळ्ळी, कर्जाळ, लिंबीचिंचोळी, वळसंग, दर्शनाळ, दोड्डी, अंकलगी, चपळगाववाडी, बासलेगाव, तीर्थ, हंजगी, दर्गनहळ्ळी, मोट्याळ, खानापूर, कर्जाळ, बोरामणी, बदलापूर, चुंगी, डोंबरजवळगे, कोराळी, मुस्ती, कि णी, मुळेगाव, शिरपनहळ्ळी, सरसंबा (ता़ आळंद)