Maha Kumbh 2025 ( Marathi News ) :उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये महाकुंभला सुरुवात झाली आहे. महाकुंभला जगभरातून लोक आले आहेत. महाकुंभचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, या महाकुंभमध्ये एक सुदर साध्वी व्हायरल झाली आहे. आता या संदर साध्वीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती साध्वी मुलांनी मुलींना आकर्षित करण्यासाठी एक मंत्र सांगत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ केआरकेने शेअर केला आहे.
कमाल आर खानने त्याच् सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये केआरकेने एक व्हिडीओ शेअर केला आहे, यामध्ये सुंदरी साध्वी म्हणून प्रसिद्धीझोतात आलेली साध्वी हर्षा दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये हर्षा हर हर महादेव, जय श्री राम म्हणत आहेत, बरेच लोक मला मेसेज करत आहेत आणि कमेंट करत आहेत की दीदी, आम्हाला आमच्या इच्छित प्रेमावर नियंत्रण ठेवायचे आहे जेणेकरून ते आमच्याशी लग्न करेल आणि कधीही वेगळे होणार नाही.
व्हिडिओमध्ये हर्षा पुढे म्हणते की, आज मी तुम्हाला असाच एक मंत्र सांगणार आहे, याद्वारे तुम्ही तुमच्या इच्छित प्रेमावर, तुमच्या प्रेयसी-प्रेयसीवर नियंत्रण ठेवू शकता आणि तो/ती तुम्हाला कधीही सोडणार नाही आणि तुम्ही जे काही बोलता ते सर्व ऐकेल. व्हिडिओमध्ये हर्ष एक मंत्र म्हणते की, 'ओम गीली गीली छू, ओम भट स्वाहा आहे'. तुम्हाला दररोज एक हजार आठ वेळा हा मंत्र जप करावा लागेल, असंही ती यामध्ये सांगत आहे.
केआरकेच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या पोस्टवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, मॅडम व्हायरल होण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत. दुसऱ्या एका युजरने लिहिले की, त्या व्हायरल होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या पोस्टवर लोकांनी अशा कमेंट केल्या आहेत. याशिवाय केआरकेने आणखी एक पोस्ट शेअर केला आहे, जी शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, मी या साध्वीला मेन रोलसाठी ऑफर करतो.
सुंदर साध्वी कोण आहे?
महाकुंभमध्ये व्हायरल झालेली सुंदर साध्वी दुसरी तिसरी कोणी नसून हर्षा रिचारिया नावाची एक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. सध्या ती सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. हर्षा रिचारिया यांचे गुरु आचार्य महामंडलेश्वर स्वामी श्री कैलाशानंद गिरी जी महाराज आहेत आणि त्या निरंजनी आखाड्याशी देखील संबंधित आहेत. याशिवाय, साध्वी होण्यापूर्वी हर्षा एक मॉडेल आणि सेलिब्रिटी अँकर देखील होत्या.