दिग्विजय सिंहांविरोधात भाजपाकडून लढणार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर?  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 01:51 PM2019-04-17T13:51:06+5:302019-04-17T15:34:04+5:30

दिग्विजय सिंह यांच्याविरोधात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Sadhvi Pragya Joins BJP, Likely to contest against Digvijay Singh | दिग्विजय सिंहांविरोधात भाजपाकडून लढणार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर?  

दिग्विजय सिंहांविरोधात भाजपाकडून लढणार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर?  

Next

भोपाळ : मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्याविरोधात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भाजपामध्ये सामील झाल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त आहे. 

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी बुधवारी भाजपात प्रवेश केला. यानंतर भोपाळमधील भाजपा कार्यालयात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी भाजपाचे वरिष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी भाजपा नेता प्रभात झा आणि रामलाल सुद्धा उपस्थित होते. दरम्यान, भाजपामध्ये सामील झाल्यानंतर भोपाळ मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवणार आणि जिंकणार असल्याचे वक्तव्य साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले आहे. तसेच, त्यांनी काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्याविरोधात निवडणूक लढणार असल्याचे सांगितले आहे.  


भोपाळ मतदार संघ भाजपाचा बालेकिल्ला आहे. या मतदार संघात 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार आलोक सांजर यांनी 7.14 लाखाहून अधिक मताधिक्याने विजयी झाले होते. तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार पी.सी.शर्मा यांनी 3.43 लाख मतं मिळाली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून भोपाळ मतदार संघातून दिग्विजय सिंह यांनी मैदानात उतरविण्यात आले आहे. तर, भाजपाकडून अद्याप या मतदारसंघासाठी कोणताही उमेदवाराचे नाव जाहीर केले नाही. 


(मोदींनी भोपाळमधून लढवावी निवडणूक; दिग्विजय सिंह यांचे आव्हान)

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. यासाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोर धरला आहे. तसेच, या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाल्याने त्यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगात येऊ लागला आहे. 

Web Title: Sadhvi Pragya Joins BJP, Likely to contest against Digvijay Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.