नवी दिल्ली - भाजपच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात झालेल्या छळामुळे एका डोळ्याची दृष्टी गेली आहे. तसेच आरोग्यविषयक अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचा गंभीर आरोप प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केला आहे. आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त राज्याच्या भाजप मुख्यालयातील कार्यक्रमाला प्रज्ञा सिंह उपस्थित होत्या. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.
'काँग्रेसने नऊ वर्षांत केलेल्या छळामुळे मला अनेक जखमा झाल्या, तर अनेक जखमा नव्याने ताज्या झाल्या. या त्रासामुळे माझ्या डोळ्यांना त्रास झाला व मेंदूला सूज देखील आली. माझ्या एका डोळ्याने मला अजिबात दिसत नाही, तर दुसऱ्या डोळ्यानेसुद्धा अंधुक दिसत आहे' असं प्रज्ञा सिंह यांनी म्हटलं आहे. 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी झालेल्या तुरुंगवासाचा संदर्भ देत त्यांनी ही माहिती दिली आहे.
भोपाळमध्ये कोरोनाच्या संकटात प्रज्ञा सिंह बेपत्ता असल्याचे पोस्टर्स अनेक ठिकाणी लावण्यात आले होते. त्यावर प्रश्न विचारला असता लॉकडाऊनच्या निर्बंधांमुळे दिल्लीहून भोपाळला येता आलं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच कर्मचारी व सुरक्षारक्षकांना तिकिटे मिळाली नाहीत अशी माहिती दिली. लॉकडाऊन सुरू झाले तेव्हा प्रज्ञा सिंह भोपाळमध्येच होत्या व नंतर अल्पशः आजारावर उपचार करण्यासाठी त्या दिल्लीला गेल्या, असा दावा काँग्रेसचे आमदार आणि माजी राज्यमंत्री पी. सी शर्मा यांनी केला. तसेच त्यांच्या काँग्रेसच्या छळवणुकीचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
वादग्रस्त वक्तव्य करुन प्रज्ञा सिंह नेहमीच चर्चेत असतात. प्रज्ञा सिंह या 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकारातील आरोपी असून त्या सध्या जामिनावर बाहेर आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रज्ञा सिंह यांनी अनेकदा वादग्रस्त विधाने केली होती. महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे देशभक्त होता. मी त्यांना राष्ट्रवादी मानते, असे त्या म्हणाल्या होत्या. 26/11 हल्ल्यात शहीद झालेले दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे माझ्या शापाने मरण पावले, असे देखील त्या म्हणाल्या होत्या. या दोन्ही विधानांमुळे ठाकूर यांनी पक्षाला अडचणीत आणले होते.
महत्त्वाच्या बातम्या
चहा विक्रेत्याच्या लेकीची कौतुकास्पद कामगिरी, फ्लाईंग ऑफिसर होऊन नेत्रदीपक भरारी
"चीनी वस्तूंचा वापर करणाऱ्यांचे पाय तोडा, घरांचं नुकसान करा"
CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! तब्बल 81 देशांमध्ये दुसरी लाट; WHO ने दिला गंभीर इशारा
मोदी सरकारच्या 'या' योजनेअंतर्गत 1000 रुपये भाड्याने मिळणार घर; जाणून घ्या कोणाला, कसा होणार फायदा
India China Faceoff : "राहुल गांधींनी यामध्ये राजकारण करू नये", जखमी जवानाचे वडील म्हणतात...
इच्छाशक्तीची गरज! भारत चीनला देऊ शकतो तब्बल 17 अब्ज डॉलरचा जबरदस्त झटका